मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलन, पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदच्या पुढाकाराने घरकुलच्या धर्तीवर वाणिज्य रोजगार संकुल उभे राहणार ताबा गुंठा योजनेचा तिसरा टप्पा


मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलन, पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदच्या पुढाकाराने घरकुलच्या धर्तीवर वाणिज्य रोजगार संकुल उभे राहणार ताबा गुंठा योजनेचा तिसरा टप्पा

अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत) मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलन, पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदच्या वतीने घरकुल वचितांना घरे देण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या ताबा गुंठा योजनेच्या तिसर्‍या टप्प्यात बेरोजगारांना रोजगार मिळण्यासाठी वाणिज्य रोजगार संकुल उभारणार असल्याची माहिती अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी दिली.

 गावाच्या रस्त्यालगत असलेल्या पड जमिनीवर लॅण्ड पुलिंगच्या माध्यमातून वाणिज्य रोजगार संकुल उभारण्यात येणार आहे. या संकुलात शेतकरी, शेतमजूर मुलांना एक गुंठा जागा देऊन, त्यांना शेती पुरक व्यवसाय थाटण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे. कोरोनामुळे अनेकांचा रोजगार बुडाला असून, अनेकांच्या नोकर्‍या गेल्या आहेत. तर अनेक युवक रोजगाराच्या प्रतिक्षेत आहे. या रोजगार संकुलाच्या माध्यमातून युवकांच्या बेरोजगारीचा प्रश्‍न सोडविण्याचे प्रयत्न केले जाणार असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

संघटनेच्या माध्यमातून वाणिज्य रोजगार संकुलाची जबाबदारी गावावर सोपविण्यात येणार आहे. घरकुलप्रमाणे रोजगार संकुल उभारण्यासाठी संघटना प्रयत्नशील आहे.विविध वस्तू बनवणे, शेतीमालावर प्रक्रिया करुन त्याची विक्री, दुग्ध प्रक्रिया करुन विविध उत्पादनांची विक्री आदि विविध व्यवसाय या संकुलात होणार आहे. तर या योजनेसाठी जागा देणार्‍या माळरानाच्या जमीन मालकांना चांगला मोबदला मिळणार आहे. ग्रामपंचायतने फक्त पाणी व रस्ते उपलब्ध करुन देण्याची गरज आहे. मागासवर्गीय व अपंगांना देखील यामध्ये आरक्षण दिले जाणार असल्याचे अ‍ॅड. गवळी यांनी म्हंटले आहे. वाणिज्य रोजगार संकुल उभारण्यासाठी अ‍ॅड. गवळी, माजी कुलगुरु सर्जेराव निमसे, कॉ.बाबा आरगडे, अशोक सब्बन, जालिंदर बोरुडे, अ‍ॅड. लक्ष्मण पोकळे, भगवान जगताप, प्रकाश थोरात, सुधीर भद्रे, वीरबहादूर प्रजापती, शाहीर कान्हू सुंबे आदि प्रयत्नशील आहेत

जाहिरात
Search
विडिओ
Recent News