शैक्षणिक परंपरेचा नावलौकिक टिकून !! आमदार आशुतोष काळे


शैक्षणिक परंपरेचा नावलौकिक टिकून !! आमदार आशुतोष काळे

- कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या ४९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलतांना आमदार आशुतोष काळे, सभेचे अध्यक्ष मा.आ. अशोकराव काळे, उपाध्यक्ष छबुराव आव्हाड, सचिव सौ. चैतालीताई काळे.

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी.

कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटी ४९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न. चालू शैक्षणिक वर्षावर कोरोना विषाणूचे संकट आहे. त्यामुळे मार्च महिन्यापासून बंद करण्यात आलेले शाळा-महाविद्यालये सुरु झालेली नाहीत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जरी शाळा बंद असल्या तरी संस्थेच्या सर्व शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये या दृष्टीकोनातून सर्व शिक्षकवृंद अथक परिश्रम घेऊन ऑनलाईन च्या माध्यमातून शिक्षण देण्याचे काम करीत आहे. या ऑनलाईन शिक्षण पद्धतीला विदयार्थी व पालक यांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळत असून कोरोना संकटातदेखील आपल्या संस्थेचा शैक्षणिक परंपरेचा नावलौकिक टिकून असल्याचे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले.

कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीची ४९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार नुकतीच खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.यावेळी ते बोलत होते सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन माजी आमदार अशोकराव काळे होते. यावेळी संस्थेच्या सचिव सौ.चैतालीताई काळे म्हणाल्या की,कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून ज्ञानदानाचे पवित्र कार्य आपली संस्था करीत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्ट्या यशाच्या शिखरावर घेऊन जाऊन त्यांना सक्षम बनवायचे असेल तर शिक्षण क्षेत्रात होणारे बदल हे स्वीकारावे लागणार असून आपल्या संस्थेने हे बदल स्वीकारून आधुनिक शिक्षणाचा नवा पायंडा पाडला असल्याचे त्यांनी सांगितले.  

सर्वप्रथम एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक स्व.शंकररावजी काळे साहेब व स्व.सौ.सुशीलामाई काळे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले.सभेच्या अध्यक्ष पदाची सूचना डॉ.चंद्रशेखर आव्हाड यांनी मांडली. सदर सूचनेस बाळासाहेब बारहाते यांनी अनुमोदन दिले. श्रद्धांजलीचा ठराव माजी विश्वस्त एम.टी.रोहमारे यांनी मांडला. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष छबुराव आव्हाड,सचिव सौ.चैतालीताई काळे,विश्वस्त कारभारी आगवण, सिकंदर पटेल,भास्करराव आवारे, ज्ञानदेव मांजरे,बाळासाहेब बारहाते,किसनराव पाडेकर, एम.टी.रोहमारे आदी मान्यवरांसह सर्व शाळा-महाविद्यालयांचे प्राचार्य व मुख्याध्यापक सोशल डिस्टनसिंग ठेवून उपस्थित होते. सूत्रसंचालन केशव दळवी यांनी केले तर आभार कारभारी आगवण यांनी मानले.


 

जाहिरात
Search
विडिओ
Recent News