कोपरगाव शहरातील व्यावसायिकांच्या दुकानांची वेळ वाढवुन देण्याची शहर दुकानदारांची मागणी !!


कोपरगाव शहरातील  व्यावसायिकांच्या दुकानांची वेळ वाढवुन देण्याची शहर दुकानदारांची मागणी !!

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी

जगावर आलेल्या कोरोना या महामारीच्या संकटाने सर्वच मानवसृष्टीच्या आरोग्यावर भिषण आघात झालेला आहे. या महामारीचा बिमोड करण्यासाठी देशातील प्रत्येक नागरीक सज्ज होउन लढत आहे.असे असतांना दुसरीकडे सर्व आर्थीक व्यवहार ठप्प झालेले आहे.रोजगार, उदयोग धंदे बंद असल्याने नागरीकांची जगण्याचीही धडपड सुरू आहे.या परिस्थितीत प्रशासनाने वारंवार केलेल्या आवाहनाला व्यावसायिकांनी प्रतिसाद दिलेला आहे. सध्या व्यावसायिकांचे दुकाने सायंकाळी ७ वाजपर्यंत सुरू ठेवली जातात.  सदरची वेळ वाढवुन रात्री ९ पर्यंत करण्यात यावी अशी मागणी कोपरगाव शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने तहसिलदार योगेश चंद्रे यांना निवेदनाद्वारे केली आहे.

भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सचिव कैलास खैरे,शहराध्यक्ष दत्ता काले, कामगार आघाडीचे संयोजक सतीश चव्हाण,शंकर बि-हाडे यांनी तहसिलदार श्री योगेश चंद्रे यांना निवेदन देउन कोपरगाव शहरातील छोटया व्यावसायाकांच्या दुकानाची वेळ रात्री ९ पर्यंत वाढविण्याची मागणी केली.

 निवेदनात पुढे म्हटले आहे की, शहरातील व्यावसायिक,फळ विक्रेते,भाजी विक्रेते,सलुन दुकाने,चर्मकार बांधव तसेच फुटाणे विक्रेते सह इतर व्यावसायिकांना सायंकाळी ७ वाजेपर्यंत दुकाने चालु ठेवण्याची परवानगी दिलेली आहे. वास्तविक हातावर पोट असलेल्या या घटकांची उदरनिर्वाहासाठी धडपड सुरू आहे.आर्थीक विवंचनेत सापडलेल्या या व्यावसायिकांच्या दुकानांची वेळ रात्री 9 पर्यंत केल्यास त्यांच्या व्यावसायाला हातभार लागून त्यांची आर्थीक विवंचना कमी होण्यास निश्चितच मदत होईल,या भावनेचा विचार करून कोपरगाव शहरातील  व्यावसायिकांना रात्री ९ पर्यंत व्यवसाय करण्यास परवानगी देण्यात यावी,अशी  मागणी कोपरगाव शहर भाजपाच्या वतीने करण्यात आली आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News