विठ्ठल होले पुणे
दौंड प्रतिनिधी --- दौंड तालुक्यातील मलथन गावच्या हद्दीत भीमा नदी पात्रात पाण्याच्या मध्यभागी अवैध दारू विक्री आणि बनविण्याचे काम सुरू असल्याची माहिती दौडचे नवनियुक्त उपविभागीय अधिकारी राहूल धस यांना मिळाली त्यानुसार त्यांच्या मार्गदर्शनाखाली पो नाईक सुरेश दडस,पो ना कमलेश होले,पो ना दिपक वायकर,अमोल गवळी,धनंजय गाढवे,होमगार्ड एस एस होले,एस एस जगताप,पी ए माने या सर्वांनी सदर ठिकाणी जाऊन छापा टाकला,मलठण गावच्या हद्दीत भीमा नदीच्या पात्रात पाण्याच्या मध्यभागी चारही बाजूने पाणी आणि एका छोट्याशा बेटावर पोलिसांना होडीने तिथे जावे लागले तेथेही काटेरी झाडीत दारू विकण्याचे आणि दारू बनवण्याचे काम जोरात सुरु होते परंतू पोलिसांची चाहूल लागताच त्याचा मालक बाळासाहेब अशोक दळवी हा तेथून पसार झाला होता,त्याठिकाणी 21 बॅरल मध्ये 4100 लिटर हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन,40 लिटर तयार हातभट्टी दारू आणि तयार करण्यासाठी लागणारी सर्व सामग्री असा एकूण 83300 रुपयांची अवैध दारू दौंड पोलिसांनी जागेवरच नष्ट केली आहे,गावठी हातभट्टीची दारू गाळप करून विक्री केल्या मुळे बाळासाहेब अशोक दळवी यांच्यावर दौंड पोलीस स्टेशन येथे गुन्हा करण्यात आला आहे.उपविभागीय अधिकारी राहूल धस यांनी पहिल्याच आठवड्यात अवैध व्यवसाय करणाऱ्या वर कारवाईचा बडगा उगारला आहे.