घरकुलापासून वंचित असणाऱ्या नागरिकांना घरकुलाचा लाभ मिळवू देवू - आमदार आशुतोष काळे


घरकुलापासून वंचित असणाऱ्या नागरिकांना घरकुलाचा लाभ मिळवू देवू  - आमदार आशुतोष काळे

पंचायत समिती व शेती महामंडळाच्या अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतांना आमदार आशुतोष काळे .

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी

 कोपरगाव विधानसभा मतदार संघातील अनेक नागरिकांना घरकुल मंजूर असून देखील स्वत:ची जागा नसल्यामुळे हे नागरिक घरकुलापासून वंचित राहत आहे अशा नागरिकांना घरकुलाचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी म्हटले आहे.

                        पंचायत समिती कार्यालय कोपरगाव येथे आमदार आशुतोष काळे यांनी नुकतीच पंचायत समिती व शेती महामंडळाच्या अधिकाऱ्यांची एकत्रित बैठक घेतली. या बैठकीत पंचायत समिती व शेती महामंडळाच्या अधिकाऱ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी बोलतांना ते म्हणाले कि, मतदार संघातील संवत्सर गावातील शेती महामंडळाच्या जागेवर मागील काही वर्षापासून अनेक कुटुंब राहत असून यामध्ये काही शेती महामंडळाचे कामगार देखील आहेत. यामध्ये लक्ष्मणवाडी २७८, रामवाडी १७८, भरतवाडी २८९, दशरथवाडी २२४, हनुमानवाडी १३८ आदी ठिकाणी शेती महामंडळाचे कामगार राहत आहेत. या कामगारांना घरकुलासाठी जागा मिळाव्या यासाठी आमदार आशुतोष काळे यांच्या सूचनेनुसार सर्व्हे करण्यात आला असून शेती महामंडळाच्या कामगारांना जमिनी देण्याबाबत तातडीने निर्णय घेतला जाणार  आहे.त्यामुळे तसेच जे कामगार मयत झाले आहेत अशा कामगारांच्या वारसांना देखील घरकुलासाठी शेती महामंडळाची जागा मिळावी यासाठी प्रस्ताव तयार करून जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवा अशा सूचना शेती महामंडळाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठपुरावा करून लवकरात लवकर जागा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे संगितले.

           तसेच अनेक गावातील गावठाण जागा संपुष्टात आल्या आहेत व त्या गावातील शाळा, पाणीपुरवठा योजना, स्मशानभूमी आदी मुलभूत सुविधांसाठी जागा उपलब्ध नाहीत अशा गावातील गावठाण विस्तारीकरणाचे प्रस्ताव करण्याच्या सूचना आमदार आशुतोष काळे यांनी यावेळी गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी यांना दिल्या असून त्याबाबत ग्रामविकास मंत्र्यांकडे आपण पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. यावेळी पंचायत समिती सभापती सौ. पौर्णिमाताई जगधने,उपसभापती अर्जुनराव काळे,जिल्हा परिषद सदस्या सौ.सोनालीताई साबळे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम,संचालक बाळासाहेब बारहाते, गटविकासअधिकारी सचिन सूर्यवंशी,उपअभियंता उत्तम पवार,कृषी अधिकारी पंडितराव वाघिरे,शेती महामंडळाचे जनार्दन डोंगरे,शिरीष लोहकणे,इरिगेशन विभागाचे दिघे साहेब,तुषार बारहाते,सूनिल कुहिले आदी उपस्थित होते.


   

जाहिरात
Search
विडिओ
Recent News