लघुउद्योजक तयार करुन बेरोजगारीचा प्रश्‍न सोडविण्यासाठी आत्मनिर्भर लघुउद्योग वसाहती निर्माण करण्याचा पुढाकार


लघुउद्योजक तयार करुन बेरोजगारीचा प्रश्‍न सोडविण्यासाठी आत्मनिर्भर लघुउद्योग वसाहती निर्माण करण्याचा पुढाकार

ताबा गुंठा व लघुउद्योग वसाहतीच्या माध्यमातून रोजी-रोटी व निवार्‍याचा प्रश्‍न सोडविणार -अ‍ॅड. गवळी

अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत) - मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलन, पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदच्या वतीने घरकुल वंचितांची घरे होण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या ताबा गुंठा योजनेला प्रतिसाद मिळत आहे. गावा-गावात लघुउद्योजक तयार करण्याच्या दृष्टीकोनाने आत्मनिर्भर लघुउद्योग वसाहती निर्माण करुन रोजी-रोटी व निवार्‍याचा प्रश्‍न सोडविण्यात येणार असल्याची माहिती अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी दिली.

 ताबा गुंठा योजनेच्या माध्यमातून शहरालगत असलेल्या गावातील शेतकर्‍यांचे खडकाळ पड जमीनी ताब्यात घेण्याचे काम सुरु आहे. या योजनेसाठी अनेक शेतकर्‍यांनी आपल्या खडकाळ पड जमीनी देऊ केल्या आहेत. एका बाजूला घरकुल उभे राहत असताना दुसरीकडे लघुउद्योग वसाहती निर्माण करुन लघुउद्योजक तयार केले जाणार आहे. तर यामुळे अनेक बेरोजगारांच्या हाताला काम मिळणार आहे. घरकुल वंचितांना एक लाखापर्यंत घरासाठी 1 गुंठा जमीन तर लघु उद्योजकांसाठी अडीच ते तीन लाखा पर्यंत 5 गुंठे जमीन देण्याचा विचार आहे. लघुउद्योग वसाहतीत खेळणी, इलेक्ट्रॉनिक साहित्य, शेतीमालावर प्रक्रिया, फर्निचर, फॅब्रिकेशन, मोठ्या कारखान्यांचे छोटाले साहित्य उत्पादन आदि विविध प्रकल्पांचा समावेश राहणार आहे. तर जमीनीच्या मोबदल्यात मुळ जागा मालक शेतकर्‍यांना देखील चांगला फायदा होणार आहे. फसवणुकीला प्रतिबंध करण्यासाठी सर्व व्यवहार बँक व हाऊसिंग सोसायटीच्या माध्यमातून होणार असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.तर जमीनीच्या मोबदल्यात मुळ जागा मालक शेतकर्‍यांना देखील चांगला फायदा होणार आहे. फसवणुकीला प्रतिबंध करण्यासाठी सर्व व्यवहार बँक व हाऊसिंग सोसायटीच्या माध्यमातून होणार असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

घरकुल प्रकल्प व लघुउद्योग वसाहती निर्माण करताना ले आऊट प्लॅन टाकून प्रशस्त रस्त्यांची व्यवस्था केली जाणार आहे. कोरोनाच्या संकटकाळात अनेकांचा रोजगार बुडाला आहे. तर अनेकांच्या नोकर्‍या गेल्या आहेत. या परिस्थितीमध्ये लघु उद्योजकांच्या माध्यमातून लहान-मोठे प्रकल्प उभे राहू शकणार आहे. राज्यकर्ते व सरकारच्या भरोश्यावर राहिल्यास त्या व्यक्तीची अधोगती झाल्याशिवाय राहणार नाही. सरकारवर विसंबून न राहता स्वत:चा विकास  साधण्यासाठी ही योजना कार्यान्वीत करण्यात आली आहे. राजकारणी मतांसाठी फक्त खोटी आश्‍वासने देऊन नागरिकांची दिशाभूल करीत आहे. नव्या मार्गाने रोजी-रोटी व निवार्‍याचा प्रश्‍न सोडविणार असल्याचे अ‍ॅड. गवळी यांनी म्हंटले आहे. या प्रकल्पासाठी आर्किटेक अर्शद शेख, अ‍ॅड. गवळी, अशोक सब्बन, विलास लामखडे, कॉ.बाबा आरगडे, ओम कदम, विठ्ठल सुरम, हिराबाई ग्यानप्पा, शाहीर कान्हू सुंबे आदि प्रयत्नशील आहेत.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News