कारखानदारांनी ऊसदर जाहीर करावा दत्तात्रय फुंदे


कारखानदारांनी ऊसदर जाहीर करावा दत्तात्रय फुंदे

शेवगाव प्रतिनिधी सज्जाद पठाण 

अहमदनगर जिल्ह्यातील सर्व साखर कारखानदारांनी ऊस तोडणी करण्यापुर्वी ऊसदर जाहीर करावा यावर्षी गळीतासाठी ऊस भरपूर असल्यामुळे कारखान्यांना गाळपासाठी अडचण येणार नाही  परंतू एकदा ऊस तुटून गेल्यानंतर ऊस ऊत्पादक शेतकऱ्यांना नंतर काही पर्याय राहत नाही. त्यामुळे  प्रत्येक कारखान्यानी प्रती टन ऊसाचा भाव जाहीर केल्यास शेतकऱ्यांना त्यांचा ऊस कोणत्या कारखान्याला द्यायचा ते ऊस उत्पादक शेतकरी ठरवतील तसेच शेवगांव परीसरात यावर्ष मोठया प्रमाणात ऊस आसल्याने गंगामाई, केदारेश्वर,वृद्धेश्वर ज्ञानेश्वर, या कारखानदारांनी आपला भाव जाहीर केल्यास ऊस ऊत्पादक शेतकरयांना आपली भुमीका ठरवता येईल केंद्र सरकारच्या धोरणानुसार एफआरपीप्रमाणे शेतकऱ्यांना एकरकमी पेमेंट पंघरा दिवसाच्या आत देणे बंधनकारक आहे.माननीय खासदार राजू शेट्टी साहेब ऊसपरिषदेमघ्ये  प्रती टन ऊसाला जो दर जाहीर करतील तो ऊसदर दिल्याशिवाय कारखान्याचे धुराळे पेटवू नये असा इशारा यावेळी देण्यात आला

जाहिरात
Search
विडिओ
Recent News