अ.भा. वारकरी मंडळाच्या महिला व बाल संस्कार समितीच्या नगर तालुका अध्यक्षपदी हिराताई मोकाटे यांची नियुक्ती


अ.भा. वारकरी मंडळाच्या  महिला व बाल संस्कार समितीच्या नगर तालुका अध्यक्षपदी हिराताई मोकाटे यांची नियुक्ती

अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत -) दरेवाडी (ता. नगर) येथील कीर्तनकार ह.भ.प. हिराताई मोकाटे यांची अ.भा. वारकरी मंडळाच्या महिला व बाल संस्कार समितीच्या नगर तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. वारकरी मंडळाचे जिल्हाध्यक्ष ह.भ.प. गणेश महाराज डोंगरे, प्रदेशाध्यक्ष ह.भ.प. अनिल महाराज वाळके व तालुकाध्यक्ष ह.भ.प. अमोल महाराज सातपुते यांनी हिराताई मोकाटे यांच्या नियुक्तीची घोषणा करुन त्यांना नियुक्ती पत्र दिले.

अ.भा. वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प. प्रकाश बोधले महाराज डिकसळकर यांनी वारकरी संप्रदायाच्या विचार धारेने कार्य करण्यासाठी ह.भ.प. हिराताई मोकाटे यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. ह.भ.प. मोकाटे यांनी आपल्या किर्तन प्रवचनाच्या माध्यमातून त्यांनी समाजासह महिलांमध्ये जागृतीचे व प्रबोधनाचे कार्य सुरु आहे. त्यांचे पती स्वर्गीय मेजर मोकाटे यांनी सैन्य दलात देशसेवेत प्राणाची आहुती दिली. हिराताईंनी स्वत:ला सावतर वीर पत्नीची भूमिका बजावत कीर्तनाच्या माध्यमातून खर्‍या अर्थाने देश व धर्मसेवेचे कार्य सुरु ठेवले आहे. या निवडीबद्दल त्यांचे अ.भा. वारकरी मंडळाच्या सर्व पदाधिकार्‍यांनी, दरेवाडी ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.  

जाहिरात
Search
विडिओ
Recent News