दौंड शहरात कोरोना आटोक्यात,दोन दिवसात शहरात चार रुग्ण तर परिसरात एकूण 12 नवे रुग्ण


दौंड शहरात कोरोना आटोक्यात,दोन दिवसात शहरात चार रुग्ण तर परिसरात एकूण 12 नवे रुग्ण

विठ्ठल होले पुणे

दौंड प्रतिनिधी --- दौंड शहरासह परिसरात कोरोना आटोक्यात आल्याचे चित्र आहे,दोन दिवसात शहरासह परिसरात फक्त 12 नवे रुग्ण आढळले आहेत,त्यापैकी शहरात चार जण कोरोना बाधीत आले असल्याचे डॉ संग्राम डांगे यांनी सांगितले आहे.दौंड उपजिल्हा रुग्णालय येथे 7/10/20 रोजी 118 व्यक्तींचे रॅपिड अँटी जेन तपासणी करण्यात आली होती त्यामध्ये फक्त पाच जण पोझिटीव आणि 113जण निगेटिव्ह आले होते त्यापैकी महिला 1आणि चार पुरुष होते,शहर 2,ग्रामीण 1,SRPF ग्रुप 5 चे 2 होते ते सर्वजण 29 ते 49 वयोगटातील आहेत,तर आज दिनांक 8/10/20 रोजी उपजिल्हा रुग्णालय दौंड तर्फे एकुण 42जणांची rapid antigen तपासणी करण्यात आली त्यांचे report अर्ध्या तासात प्राप्त झाले

पैकी एकूण 7व्यक्तीचे अहवाल positive आले आहेत तर 35 व्यक्ती चे report negative आले आहेत. Positive मध्ये महिला-- 4,पुरूष --3,प्रभाग -

दौंड शहर=2, ग्रामीण=5

33  ते  60 वर्ष वयोगटातील आहेत,या दोन दिवसांत कोरोना  ने विश्रांती घेतली आहे,हा संसर्ग शहरासह परिसरात आटोक्यात आला आहे,जनतेने असेच सहकार्य करावे,शासनाचे सर्व नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करा आणि माझे कुटुंब माझी जबाबदारी अंतर्गत आपल्या स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या असे आवाहन डॉ संग्राम डांगे यांनी केले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News