वाघ्या-मुरुळी कलावंतांचे प्रश्न शासन दरबारी मांडू- आ. बबनराव पाचपुते.


वाघ्या-मुरुळी कलावंतांचे प्रश्न शासन दरबारी मांडू- आ. बबनराव पाचपुते.

काष्टी आमदार बबनराव पाचपुते यांना मागणीचे निवेदन देताना नानासाहेब साळुंके,नवनाथ पवार सह कलावंत

श्रीगोंदा प्रतिनिधी (अंकुश तुपे) दि.८: कलेच्या माध्यमातून पारंपरिक लोकलला जीवंत ठेवून समाजाला दिशा देण्यासाठी समाज प्रबोधनाबरोबर उपजीविका करणाऱ्या वाघ्या मुरुळी कलावंतावर कोरोना महामारीत उपासमारीचे संकट उभे राहिले आहे. त्यांचे प्रश्न शासन दरबारी मांडून सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करु असे आश्वासन माजी मंत्री आमदार बबनराव पाचपुते यांनी वाघ्या मुरुळी कलावंताना दिले आहे. 

      बुधवार दि.७ रोजी वाघ्या मुरळी परिषद महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष प्रा. मार्तंड साठे  यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीगोंदा तालुक्यातील वाघ्या मुरळी परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने कलावंत  मंडळीनी एकत्र येवून आ.बबनराव पाचपुते तहसिलदार प्रविण पवार,पोलिस निरिक्षक दौलतराव जाधव यांच्याकडे आपल्या मागण्यांचे निवेदन देवून मागणी स्वरुपात मल्हार देवाची वारी मागितली आहे.

          वाघ्या मुरळी परिषद महाराष्ट्र राज्य श्रीगोंदा तालुका अध्यक्ष नानासाहेब साळुंके,उपाध्यक्ष नवनाथ पवार,कार्याध्यक्ष मल्हारी काटे,बाळासाहेब येळपणेकर,सचिव राहुल पवार,सल्लागार संजय शिंदे यांच्यासह  मोठ्या संख्येने   संघटनेचे लोककलावंत पारंपरिक पोषाखात एकत्र येवून तालुक्यातील लोकप्रतिधी व प्रशासनाला आपल्या मागण्यांचे निवेदन देवून मागणी शहरूपात मल्हार देवाची.वारी मागितली आहे.आणि आपल्या  विविध मागण्याची विनंती केली आहे.

        निवेदनात वाघ्या मुरुळी लोककलावंत अनादिकालापासून धर्मजागरण,कुळधर्म, कुळाचार,पालन समाजप्रबोधन कार्यक्रम करून कुटुबांचा  उदरनिर्वाह करीत आहेत. परंतु  गेल्यावर्षी अतिवृष्टी,निवडणूकीची आचारसंहीता या काळात जगण्यापुरते उत्पन्न मिळू शकले नाही.आणि  आता गेली आठ महिन्यांपासून लाॕकडाऊनमुळे जागरण गोंधळ कार्यक्रम होवू शकले नसल्याने  कलावंताचे कुटुंब  आर्थिक संकटात सापडून त्याच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. वाघ्या मुरळी कलावंतांना उदर निर्वाहनासाठी विशेष निधी अनुदान स्वरूपात मंजूर करावा, कलावंतांच्या मुला मुलींचा शिक्षणाचा सर्व खर्च शासनामार्फत करण्यात यावा, आमच्या  लोक कलेस शासन दरबारी अधिकृत मान्यता मिळून नोंदणी करण्यात यावी.या कलावंतांच्या निवासासाठी शासनाकडून जमीनी,घर या स्वरूपात विशेष योजना मंजूर करण्यात यावी. कायमस्वरूपी पेन्शन योजना सुरू करावी. महाराष्ट्रातील कलावंतासाठी स्वतंत्र लोककलावंत आर्थिक विकास मंडळ स्थापन करण्यात यावे कोरोना सारख्या काळात  नियमाचे पालन करून लोककलावंतांना कुलाचाराचे कार्यक्रम करण्यात परवानगी मिळावी. देवालये- मंदिर खुली करावीत. अशी मागणी कलावंतानी मोठ्या संख्येने एकत्र येवून केली आहे.


जाहिरात
Search
विडिओ
Recent News