पाच नंबर तलावाला नगरविकास खाते निधी देणार... ना.प्राजक्त तनपुरेंची आमदार आशुतोष काळेंना ग्वाही !!


पाच नंबर तलावाला नगरविकास खाते निधी देणार... ना.प्राजक्त तनपुरेंची आमदार आशुतोष काळेंना ग्वाही !!

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी.

 कोपरगाव शहराचा पाणीप्रश्न मिटविण्यासाठी भविष्यात महत्वाची भूमिका पार पाडणाऱ्या पाच नंबर साठवण तलावाच्या पुढील कामासाठी तयार करण्यात आलेल्या आराखड्याला मंजुरी मिळावी. याबाबत आमदार आशुतोष काळे यांची नुकतीच नगरविकास राज्यमंत्री ना.प्राजक्त तनपुरे यांचेसोबत झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असून पाच नंबर साठवण तलावासाठी नगरविकास खात्याकडून निधी देवू व कोपरगाव शहराच्या हद्दवाढ झालेल्या भागाला पाणी पुरवठा करण्यासाठी वाढीव पाईपलाईन योजनेला निधी उपलब्ध करून दिला जाईल अशी ग्वाही नगरविकास राज्यमंत्री ना.प्राजक्त तनपुरे यांनी आमदार आशुतोष काळे यांना दिली आहे.कोपरगाव शहराच्या पाच नंबर साठवण तलावासह मतदार संघातील ऊर्जा, नगरविकास व पाणी पुरवठा खात्याच्या विविध विकास कामांच्या प्रश्नांबाबत आमदार आशुतोष काळे यांची गुरुवार (दि.८) रोजी नगरविकास राज्यमंत्री ना.प्राजक्त तनपुरे व पाणीपुरवठा राज्यमंत्री नामदार संजय बनसोडे तसेच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक  पार  पडली या बैठकीत कोपरगाव विधानसभा मतदार संघाच्या विविध विकासकामांच्या विषयांवर सकारात्मक चर्चा झाली.

                        राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या सहकार्यातून गायत्री कंन्स्ट्रक्शन कंपनीच्या मदतीने कोपरगाव शहरातील पाच नंबर साठवण तलावाचे प्राथमिक स्वरूपातील खोदाई काम पूर्ण करण्यात आमदार आशुतोष काळे यशस्वी झाले आहे. मात्र या साठवण तलावात भविष्यात पाणी साठविण्याच्या दृष्टीने या साठवण तलावाचे यापुढील काम होणे अत्यंत गरजेचे आहे. या कामाचा प्रारूप आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्याला नगरविकास खात्याने मंजुरी देऊन तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी नगरविकास राज्यमंत्री ना.प्राजक्त तनपुरे यांच्याकडे या बैठकीत केली असता सदर मागणीची ना.तनपुरे यांनी दखल घेऊन साठवण तलावाच्या पुढील कामासाठी निधी उपलब्ध करून देणार असल्याचे यावेळी सांगितले. कोपरगाव शहराच्या हद्दवाढ झालेल्या भागातील नागरिकांना दिलासा देतांना या भागातील वाढीव पाईपलाईन योजनेला निधी देवू अशी ग्वाही दिली. यावेळी आमदार आशुतोष काळे यांनी मतदार संघातील विविध प्रश्नांकडे मत्र्यांचे लक्ष वेधले. यामध्ये कोपरगाव विधानसभा मतदार संघात अनेक गावांमध्ये सरकारी जागा उपलब्ध असून या जागेवर सोलर पॉवर प्लांट उभारून घरगुती व शेती पंपासाठी वीज उपलब्ध करून द्यावी. कोपरगाव शहरातील उच्चदाब व लघुदाब वीज वाहिन्या भूमिगत करण्यासाठी ५५ कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजूर झालेला असून त्याबाबत कोणतेही काम पूर्ण झालेले नाहीत. त्याची चौकशी करून कार्यवाही करावी. मतदार संघात नवीन कृषीपंप कनेक्शन बाबत एकूण १५७० शेती पंपाचे नवीन अर्ज प्रलंबित असून त्या ग्राहकांना तातडीने कनेक्शन मिळावे. ओव्हरलोड रोहीत्रांची संख्या मोठ्या प्रमाणात असून सदरच्या रोहित्रावर असलेला ओव्हरलोड कमी करण्यासाठी नवीन रोहित्र मिळावे. जल जीवन योजनेसाठी घातलेली १०% लोकवर्गणीची अट रद्द करावी. तसेच धारणगाव पाणी पुरवठा योजना पुनर्जीवित करून रांजणगाव देशमुख पाणी पुरवठा योजनेसाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी नगरविकास राज्यमंत्री ना.प्राजक्त तनपुरे व पाणीपुरवठा राज्यमंत्री नामदार संजय बनसोडे यांच्याकडे केली.


जाहिरात
Search
विडिओ
Recent News