संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी.
कोपरगाव तालुक्यातील प्रथम _ महिला आमदार सौ स्नेहलताताई कोल्हे यांचा ४९ वा वाढदिवस चांदेकसारे येथे अनोख्या पध्दतीने साजरा करण्यात आला.दि.८ आक्टोबर रोजी पहाटे ग्रामस्थांनी ग्रामदैवत श्री बालभैरवनाथाच्या मंदिरात अभिषेक व महाआरती करून स्नेहलताताईना उत्तम आरोग्य व स्वास्थ्य लाभो अशी प्रार्थना केली.
माजी सरपंच केशवराव होन यांचा मार्गदर्शनाखाली साई आधार प्रतिष्ठानच्या वतीने महिलांना ५१ तुळशी चे रोपटे देण्यात आले व गावात ५०० पेरूचे रोपे वाटण्यात आली. या वेळी माजी सरपंच केशवराव होन बोलतांना म्हणान की कोरोना सारख्या भिषण संकटकाळात स्वत:आजाराशी लढतांनाही मतदार संघात कोरोना संसर्गापासून नागरिकांचा बचाव व्हावा.बाधीत रुग्णांना सेवा मिळावी म्हणुन सर्वात प्रथम कार्य सुरू करुन यंत्रणा राबवली व आजही हे कार्य अव्याहतपणे सुरू आहे.
या प्रसंगी साई आधार प्रतिष्ठान चे मार्गदर्शक श्री केशवराव होन,श्री ज्ञानेश्वर होन,रावसाहेब पाटील होन,धर्मा पाटील जावळे,किरण होन,व्यंकट होन,अर्जुन होन,वैभव पवार,जितेंद्र होन व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.