कुंभारी गावाची कोरोना मुक्तीकडे वाटचाल. !!


कुंभारी गावाची कोरोना मुक्तीकडे वाटचाल. !!

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी.

कोपरगाव तालुक्यातील कुंभारी येथे माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहीमे अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र टाकळी येथील वैद्यकीय अधिकारी.विकास घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाच्या वतीने आज कुंभारी गावांमध्ये मागील आठवड्यामध्ये वाढलेल्या कोरोना संसर्गच्या पार्श्वभूमीवर आज 8/10/2020 रोजी एकण ८७ नागरीकांची रॅपिड अँटिजिन टेस्ट करण्यात आली असुन सर्वच अहवाल नकारात्मक आल्याची माहीती वैद्यकिय अधिकारी विकास घोलप यांनी दिली. कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आ.आशुतोष दादा काळे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली वाटचाल करत असलेल्या ग्रामपंचायत कुंभारी यांच्या सहकार्याने या कॅम्पचे आयोजन करण्यात आले या कार्यासाठी प्रामुख्याने सभापती पौर्णिमाताई जगधने उपसभापती अर्जुनराव काळे सरपंच प्रशांत घुले उपसरपंच दिगंबर बडे डॉक्टर मानसी कापरे ग्रामसेवक एस जे कासवे पोलीस पाटील उल्हास मेढे,धारणगाव उपकेंद्राचे आरोग्य सेवक डॉ.खरे डॉ दत्तात्रय आहेर आशा सेविका  मनीषा पवार शिंदे ताई  कृषी सहाय्यक  निलेश बिबवे  वसंत भाऊ घुले सर्व ग्रामपंचायत सदस्य सर्व ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला आज तालुक्यातील गावोगावी कोरोना चा संसर्ग वाढत असताना  कुंभारी ग्रामस्तरीय समितीने कोविंड रॅपिड टेस्ट साठी पुढाकार घेतला गावामध्ये संशयी किंवा जनसंपर्क या सर्वांची टेस्टकरून घेण्यात आली तसेच गावामध्ये ग्रामपंचायत कमिटीच्या वतीने चौथ्यांदा संसर्गजन्य आजार रोखण्यासाठी सोडियम क्लोराइडऔषधची फवारणी करण्यात आली वैद्यकीय अधिकारी टाकळी अंतर्गत उपकेंद्र कुंभारी यांच्यावतीने माझी कुटुंब माझी जबाबदारी अभियानात सर्व ग्रामस्थांची तपासणीचा दुसरा टप्पा पूर्ण केला तसेच सर्व उपक्रमातग्रामपंचायतीने उत्स्फूर्त सहभाग नोंदविला गावांमध्ये या सर्व उपक्रमांत बद्दल मोठ्या प्रमाणात जनजागृती व शिवार फेरी काढण्यात आली या सर्व सहभागी अधिकारी कर्मचारी व बंधू-भगिनी ज्येष्ठ नागरिक ग्रामस्थ यांचे सरपंच प्रशांत घुले यांनी आभार व्यक्त केले.

  मास्क व सॅनी टायझरचा वापर व सोशल डिस्टंसिंगचे नियमांचे पालन केले तर गावाला आपण निश्चितच कोरना मुक्त ठेऊ शकू असे मत गावचे पोलिस पाटिल उल्हास मेढे यांनी व्यक्त केले

जाहिरात
Search
विडिओ
Recent News