नगर( प्रतिनिधी संजय सावंत) -नगर येथील सामाजिक कार्यकर्ते व प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक रमेश रामदास साळुंके यांच्या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या अहमदनगर महानगर जिल्हाध्यक्षपदी त्यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे.या निवडीसाठी प्रदेशाध्यक्ष खासदार रामदासजी तडस,कार्याध्यक्ष अशोक काका व्यवहारे कोषाध्यक्ष गजू नाना शेलार,महासचिव डॉ.भूषण कर्डीले,आरटी अण्णा चौधरी,नाशिक विभागीय अध्यक्ष हरिभाऊ डोळसे यांच्या आदेशाने या नेमणुका करण्यात आल्या आहेत. त्यांच्या या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.