जेऊर बायजाबाई गावचे भूषण जाधव , दारकुंडे , शिंदे या सुपुत्राचा सन्मान


जेऊर बायजाबाई गावचे भूषण जाधव , दारकुंडे , शिंदे या सुपुत्राचा सन्मान

अहमदनगर प्रतिनिधी ( संजय सांवत ) नगर तालुक्यांतील जेऊर बायजाबाई गावचे सुपुत्र श्री . रोहीदास जाधव महाराज यांची अ .भा . वारकरी मंडळाच्या नगर तालुका व्यसनमुक्ती व स्वच्छता अभियान सचिव पदी निवड झाल्याने तसेच सुदाम महाराज दारकुंडे यांची अ .भा . वारकरी मंडळाच्या नगर तालुका गोपालक समितीचे सचिव पदी निवड व सोमनाथ महाराज शिंदे यांची नगर तालुका व्यसनमुक्ती सचिव पदी निवड झाल्याने जेऊर बायजाबाई चे तालुका नगर येथील यशश्री स्कूलचे डायरेक्टर सौ . मनिषा राजेंद्र पवार व यशस्वी अकादमीचे फिजकिल डायरेक्टर श्रीयुत राजेंद्र अनंतराव पवार सर यांनी अखिल भारतीय वारकरी समितीच्या मंडळावर नव्याने निवड झाल्याने या तीन सन्मानिय व्यक्तीचा सत्कार करण्यांत आला . जेऊर बायजाबाई गावचे सेवानिवृत्त नायब तहसीलदार रोहीदास जाधव महाराज हे दत्त भक्त असल्याने त्यांनी आपल्या शेतातच भव्य असे दत्त मंदीर व अन्न क्षेत्र उभारले असून सामाजिक , धार्मिक क्षेत्रात ते नेहमी आघाडीवर असतात . सौ . मनिषा राजेंद्र पवार व श्रीयुत राजेंद्र रोहीदास महाराज यांचे कन्या व जावई असून त्यांनी शैक्षणीक क्षेत्रातील उज्ज्वल परंपरा पाप्त केलेली आहे . अशा या तीन व्यक्तीचे जेऊर बायजाबाई गावातून सर्वत्र कौतुक होत आहे .

जाहिरात
Search
विडिओ
Recent News