धारणगावात आरोग्य विभागामार्फत ग्रामस्थांची रॅपिड अँटिजिन टेस्ट !!


धारणगावात आरोग्य विभागामार्फत ग्रामस्थांची रॅपिड अँटिजिन टेस्ट !!

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी

धारणगाव - दि ७ ऑक्टोबर २० २०रोजी कोपरगाव तालुक्यातील धारणगाव येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत माझे कुंटुब माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत कोविड19चा प्रार्दुभाव रोखण्या हेतुने ग्रामस्थांची रॅपिड अँटिजिन टेस्ट केल्याची माहिती सरपंच नानासाहेब चौधरी यांनी दिली.

कोपरगाव तालुक्यात कोविड19चा वाढता प्रार्दुभाव रोखण्यासाठी तालुक्यात आरोग्य विभागाच्या वतीने माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहीमे अंर्तगत दि. १५ सप्टेबर ते १० ऑक्टोबर या पहील्या टप्यात घरोघरी जाऊन नागरीकांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे.

या पाश्र्वभुमीवर प्राथमिक आरोग्य केंद्र टाकळी कर्मचारी पथकाने धारणगाव येथे आरोग्य तपासणी मोहीम राबविली असुन या मोहीमे अंतर्गत १७ नागरीकांची रॅपिड अँटिजिन टेस्ट केली असुन सर्वांचे अहवाल नकारात्मक आल्याची माहीती डॉ.आदित्य पाटील यांनी दिली आहे

.या मोहीमेत समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.आदित्य पाटील, धारणगाव उपकेंद्राचे आरोग्य सेवक डॉ.आर.एस खरे. मुर्शतपुर चे आरोग्य सेवक डॉ.ए.एम चव्हाण, डॉ.एम०ही माळी आशा सेविका योगीता सुरे, गंगासागर कुहिटे, आशा पवार, अर्चना सांगळे,वच्छला सुरे या पथकाने या कामी परीश्वम घेतले असुन सरपंच नानासाहेब चौधरी, ग्रामसेविका पि.के.अहिरे,गाव कामगार तलाठी धनंजय कऱ्हाड, पो.पाटील निळकंठ रणशुर यांचे सहकार्य लाभले. नागरीकांनी विनाकारण बाहेर फिरू नये मास्क व सॅनिटायझरचा नियमित वापर करावा प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करावे असे आवाहन सरपंच नानासाहेब चौधरी यावेळी केले

जाहिरात
Search
विडिओ
Recent News