हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते विविध नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा गौरव


हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते विविध नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा गौरव

काकासाहेब मांढरे इंदापूर प्रतिनिधी ( दि. ५ ऑक्टोबर ) :माजी सहकार मंत्री, महाराष्ट्र राज्य मा.श्री. हर्षवर्धनजी पाटील साहेब यांच्या शुभहस्ते , आज  सोमवार दि.५/१०/२०२० रोजी  श्री. केतकेश्वर मंगल कार्यालय निमगाव केतकी येथे श्रमीक पत्रकार संघ, इंदापूर तालुका अखिल भारतीय गरीब निर्मुल समिती विश्व वारकरी सेना संघटना या सर्व प्रमुख पदाधिकारी व जेष्ठ पत्रकार यांचा  गौरव समारंभ संपन्न झाला. साहेब यावेळी बोलताना म्हणाले की ,"श्रमिक  पत्रकार संघ हा पत्रकारिता क्षेत्रातील प्रामाणिक पणे काम करणारे संघटन असून, आपली नैतिकता जपून समाजहित करण्याकडे त्यांचा स्थापनेपासूनच मोठा वाटा आहे. ही पत्रकारिता क्षेत्रीय क्षेत्रातील एक चळवळ असून या चळवळीशी जोडलेल्या सर्वांचे मी हार्दिक अभिनंदन करतो . इंदापूर तालुका अखिल भारतीय गरीबी निर्मूलन समिती  च्या सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे  गरिबी निर्मुलनाची चळवळ इंदापुरात प्रभावीपणे राबवावी . कोणत्याही पदाच्या जबाबदाऱ्या ह्या अधिकारा सहीत असतात  त्यासाठी  प्रामाणिक काम करण्याची तयारी ठेवावी लागते  यासाठी  आपणाला मनःपूर्वक शुभेच्छा देतो आपले हार्दिक अभिनंदन करतो . ते पुढे म्हणाले   विश्व वारकरी सेना संघटना च्या सर्व ह. भ. प .महाराजांनी तालुक्यात वारकरी संप्रदायाचे अधिष्ठान उभारण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत. नैतीक आणि सामाजिक बांधिलकी जपण्यासाठीचे संस्कार आपल्या किर्तनाच्या माध्यमातून  व्हावे . वारकरी संप्रदायाची परंपरा खूप मोठी असून या परंपरेत विचारांचं अधिष्ठान मोठे आहे माऊली सुद्धा स्वतःला महत्त्व न देता वाचावी ज्ञानेश्वरी असे म्हणतात त्यामुळे ग्रंथ हाच गुरु असतो.  ज्ञानेश्वरीचे तत्वज्ञान हे जगातील महान तत्त्वज्ञान आहे  हे तत्वज्ञान आपल्या माध्यमातून  सर्वसामान्य लोकांपर्यंत  गेले पाहिजे त्यादृष्टीने प्रयत्न आपण करावेत .आपणा सर्व पदाधिकाऱ्याना माझ्या व संपूर्ण इंदापूर तालुक्याच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो अशा शब्दात माननीय हर्षवर्धन पाटील साहेबांनी सर्वच पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले आणि  सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचे   आयोजन श्री.अमोलराजे इंगळे मित्र परिवार यांनी केले होते. सौजन्य शिवराज ज्वेलर्स  यांचे लाभले  होता त्यांचेही यावेळी उत्तम आयोजनासाठी पाटील यांनी आयोजकाचेआभार मानले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News