कोरोना महामारीने सर्वानाच त्रास झाला आहे,पण कुटुंबाच्या रक्षणासाठी प्रशासनाला सहकार्य करा -- DYSP राहूल धस


कोरोना महामारीने सर्वानाच त्रास झाला आहे,पण कुटुंबाच्या रक्षणासाठी प्रशासनाला सहकार्य करा -- DYSP  राहूल धस

विठ्ठल होले पुणे

दौंड प्रतिनिधी -- दौंड उपविभागीय अधिकारी म्हणून राहूल धस यांनी पदभार स्वीकारला आहे.2016/17 साली परिविक्षाधीन अधिकारी अकोला जिल्हा येथील संवेदन शील भागात हा कालावधी पूर्ण केला नंतर  अधिकारी म्हणून 2017 ते 2019 पर्यंत SDPO उस्मानाबाद जिल्ह्यात उमरगा येथे कार्यरत 2019 ते 20 पर्यंत बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई. परळी . येथे कर्तव्य बजावले आणि या महिन्याच्या सुरुवातीला दौंड उपविभागीय अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला आहे, कर्तव्यतत्पर अधिकारी दौंड तालुक्याला लाभले आहेत. आमच्या प्रतिनिधी शी बोलताना त्यांनी सांगितले की कोरोना महामारीने संपूर्ण देश ग्रासला आहे,प्रत्येकाला त्याचा त्रास झाला आहे आणि होत आहे परंतू ही संसर्ग जन्य महामारी असल्याने आपल्या कुटुंबाचा विचार करून योग्य ती काळजी घेतल्यास आपण सुरक्षित राहू,त्यासाठी सर्वांनी प्रशासनाने दिलेले नियम पाळून सहकार्य करावे,तसेच प्रत्येक गावात तंटामुक्ती अध्यक्ष,पोलीस पाटील यांची नियुक्ती असावी त्यांच्या  सहकार्याने गावात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी उपयुक्त राहील. दौंड शहर आणि तालुक्यातील जनतेने नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News