कृषी विधेयकाला स्थगिती देणाऱ्या महाविकास आघाडी सरकारला शेतकरी कदापि माफ करणार नाही! विवेकभैय्या कोल्हे


कृषी विधेयकाला स्थगिती देणाऱ्या महाविकास आघाडी सरकारला शेतकरी कदापि माफ करणार नाही! विवेकभैय्या कोल्हे

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी

लाॅकडाउनच्या काळात अर्थव्यवस्था ठप्प झालेली असतांना कृषी उत्पन्नामुळे अर्थव्यवस्थेला बळकटी मिळाली, जगाचे अर्थचक्र थांबले असतांना शेतकरी मात्र थांबला नाही,केंद्र सरकारने शेतकरी हिताचा निर्णय घेतला असतांना राज्य सरकार या निर्णयाला स्थगिती देते ही बाब निंदनीय असून शेतक-यांच्या आयुप्यातील हा काळा दिवस असल्याची टीका करून राज्यातील सरकारला हा कायदा स्विकारण्यास भाग पाडण्यासाठी यापुढे तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा युवा नेते विवेक बिपीनदादा कोल्हे यांनी दिला.

केद्र सरकारने संसदेच्या दोन्ही सभागृहात ऐतिहासिक कृषी विषयक विधेयक मंजुर करून शेतक-यांच्या जीवनात अमुलाग्र क्रांती घडविणारे पाउल उचलले आहे, परंतु केंद्राच्या कायदयाच्या अंमलबजावणीस राज्य सरकारने स्थगिती देण्याचा आदेश काढला, राज्य सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात महाविकास आघाडी सरकारचा भारतीय जनता पार्टीच्या वतीने राज्यभर निषेध करण्यात आला. कोपरगाव येथील तहसिल कार्यालयावर भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव सौ स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली, युवा नेते विवेक कोल्हे यांच्या उपस्थितीत निषेध आंदोलन करण्यात आले.यावेळी भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम, जिल्हा सचिव कैलास खैरे,शहराध्यक्ष दत्ता काले, भाजयुमोचे बाळासाहेब पानगव्हाणे,सहकार महर्पी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन आप्पासाहेब दवंगे,माजी उपनगराध्यक्ष विजय वाजे, विजय आढाव,पराग संधान, शिवाजी वक्ते,बाळासाहेब नरोडे, संजय होन,भास्करराव भिंगारे, ज्ञानेश्वर परजणे,प्रदीपराव नवले, राजेंद्र कोळपे,अशोक औताडे, बाजार समितीचे माजी उपसभापती नानासाहेब गव्हाणे, विक्रम पाचोरे,सोपानगराव पानगव्हाणे,स्वप्नील निखाडे, वैभव गिरमे, सत्येन मुंदडा, सुषांत खैरे, खलील कुरेषी, सतीष रानोडे, गोपी सोनवणे, गोपीनाथ गायकवाड, अर्जुन मोरे आदी उपस्थित होते.

या वेळी कोल्हे पुढे म्हणाले, आमचा धर्म शेतकरी आहे, आम्हांला संघर्षाचा वारसा आहे, माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांनी आयुप्यभर शेतक-यांचे प्रश्न सोडविण्यासाठी झगडले, मार्गी लावण्यासाठी आयुष्य खर्ची केले. सरकारमध्ये असतांनाही शेतक-यांच्या प्रश्नांसाठी ते स्वकीयांशी भांडले, परंतु सरकारकडून प्रश्न मार्गी लावून घेण्यासाठी कधी मागे हटले नाही, शेतक-यांच्या हितासाठी तसेच त्यांच्या उत्पन्नाला बाजारपेठ मिळावी, योग्य भाव मिळावा म्हणून विविध संस्थांच्या माध्यमातून शेतक-यांना मदतीचा हात दिला,आज त्यांच्या स्वप्नातील विधेयक केंद्र सरकारने मंजुर केले, काॅग्रेस सरकारच्या वचननाम्यात असलेला,माजी केंद्रीय कृषी मंत्री यांच्या आत्मचरित्रात उल्लेख असलेल्या विषयावर देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी यांनी कायदा केला, परंतु शेतक-यांच्या विषयी बेगडी प्रेम असलेल्या नेत्यांनी राज्यामध्ये या कायदयाची अंमलबजावणी करण्याऐवजी केवळ मोदी साहेबांनी आणलेल्या विधेयकाला विरोध म्हणून स्थगिती देण्याचे पाप केले, परंतु राज्यातील महाविकास आघाडी सरकारला शेतकरी कदापीही माफ करणार नाही, असेही श्री कोल्हे म्हणाले.

कोपरगाव विधानसभा मतदार संघ हा कृषीप्रधान आहे, शेतक-यांच्या प्रश्नासाठी पक्षभेद विसरून एकत्र येण्याची परंपरा या तालुक्याने पाहिली आहे,शेतकरी हिताचे सर्वमान्य विधेयक केंद्रसरकारने आणले आहे, यासाठी येथील लोकप्रतिनिधींनी शेतक-यांच्या हिताच्या प्रश्नासाठी सरकारला विधेयक स्विकारण्यास भाग पाडावे,असे आवाहन केले. लाल दिव्याच्या मोहापायी पक्षश्रेप्ठींना खुष करण्यापेक्षा मतदार संघातील गोरगरीब आणि शेतकरी बांधवांच्या जीवनात सुख, समृध्दी आणि भरभराटीचा दिवा लावावा, असा सल्लाही श्री कोल्हे यांनी दिला.

नायब तहसिलदार योगेश्वर कोतवाल यांना निवेदन देण्यात आले. प्रास्ताविक व सुत्रसंचालन तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम यांनी केले,  विक्रम पाचोरे यांनी मनोगत व्यक्त केले. शहराध्यक्ष दत्ता काले यांनी आभार मानले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News