सभासद व कर्मचारी यांना विमा योजनेचा लाभ द्या/ पानसरे


सभासद व कर्मचारी यांना विमा योजनेचा लाभ द्या/  पानसरे

श्रीगोंदा(प्रतिनिधी अंकुशतुपे):-कधी अवकाळी,कधी दुष्काळ तर कधी रोगामुळे शेतकरी आर्थिक नुकसान सोसत असताना गेल्या ७ महिन्यापासून कोरोना संकटाने उपचारासाठी लाखो रुपये मोजावे लागत असल्याने शेतकरी हवालदिल असल्याने स म शिवाजीराव  नागवडे सहकारी साखर कारखान्याने सभासदांना २लाखाच्या विम्याचे कवच देण्यासाठी पुढाकार घेण्याची मागणी जिल्हा सह बँक संचालक दत्तात्रय पानसरे यांनी कार्यकारी संचालक रमाकांत नाईक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे यात सभासद सह त्याच्या कुटुंबातील सदस्यांनाही विम्याचे संरक्षण देण्याची तसेच २लाखपुढील उपचार खर्असलेल्या कार्पोरेट बफर योजनेचीही तरतूद करण्याची  मागणी केलीआहे.

पानसरे यांनी सांगितले कि नगदी पीक म्हणून शेतकरी ऊसाची लागवड करतो पण त्यातून येणारा पैसा उपचारात खर्च होणार असेल तर शेतकऱ्यांची प्रगती खुंटेल त्यामुळे कारखान्याने पुढाकार घेण्याची गरज कोरोना मुळे निर्माण झाली आहे.असे सांगून शेतकरी टिकला तर सहकार टिकणार आहे व सहकार टिकला तर शेतकरी टिकणार असल्याने कारखान्याने आपल्या मागणीचा विचार करावा असे आवाहन केले आहे.

दरम्यान पानसरे यांनी जिल्हा बँकेचे शेतकऱ्यांसाठी लॉक डाऊन काळातील योजना घरोघर पोहोचवून हजारो शेतकऱ्यांना योजना मिळवून देतानाच विम्याची मागणी केल्याने सभासद वर्गातून कौतुक होत आहे

जाहिरात
Search
विडिओ
Recent News