पिंपळी येथील ग्रामविस्तार अधिकारी संजय गावडे यांचे निधन, गुरुवारी बारामतीत दशक्रिया विधी


पिंपळी येथील ग्रामविस्तार अधिकारी संजय गावडे यांचे निधन, गुरुवारी बारामतीत दशक्रिया विधी

बारामती : प्रतिनिधी (काशिनाथ पिंगळे)

पिंपळी येथील ग्रामविस्तार अधिकारी कै. संजय बाबुलाल गावडे यांचे मंगळवार दि.२९ सप्टेंबर रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांचे वय ५३ वर्षांचे होते. त्यांनी आपल्या कारकीर्दीत आदर्श ग्रामसेवक पुरस्कार प्राप्त केला होता, ते सध्या पिंपळी (ता.बारामती) येथे कार्यरत होते.

    बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व विद्यमान संचालक बाळासाहेब गावडे यांचे ते छोटे बंधू होत. त्यांच्या पश्‍चात आई, पत्नी, २ मुले, १ मुलगी, ३ भाऊ असा मोठा परिवार आहे. दशक्रिया विधी गुरुवार दि. ८ ऑक्टोबर रोजी बारामती कचेरीच्या पाठीमागे कऱ्हा नदी तीरावर सकाळी ८ वाजता होणार आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News