धामोरी घटनेतील अज्ञात व्यक्तीस शोधून त्यावर गुन्हे दाखल करा !! शरद खरात


धामोरी घटनेतील अज्ञात व्यक्तीस शोधून त्यावर गुन्हे दाखल करा !! शरद खरात

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी.

कोपरगाव तालुक्यातील धामोरी गावात डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या अज्ञात व्यक्तीस शोधुन अटक करण्यात यावी तसेच येथून पुढे गावात अशा घटनेची पुनरावृत्ती होउ नये यासाठी उपाययोजना करण्यात यावी या मागणीचे निवेदन वंचित बहुजन आघाडी,भारती बौद्ध महासत्ता लोकजनशक्ती पार्टी,एक लव्य आदिवासी परिषद संघटने मार्फत धामोरी गावाचे सरपंच,पोलिस पाटील, ग्रामविकास अधिकारी, यांना  देण्यात आले आहे.

      सविस्तर वृत्त असे की धामोरी गावातील सार्वजनिक स्वच्छता गृहाच्या भिंतीवर कोणी अज्ञाताने डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल महिन्यात दोन वेळा जातीवाचक लिखाण करून जातीय तेढ निर्माण करून गावामध्ये दंगल घडविण्याचा प्रयत्न केला आहे. तरी असे गैरवर्तन करणा-या समाजकंटकास दहा दिवसात शोधुन अटक करावी व गुन्हा दाखल करावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष शरद खरात भारती बौद्ध महासभा जिल्हा संघटक रमेश निकम, मंगेश कानाडे, (एकलव्य आदिवासी परिषद  संघटना ) गणेश रणशुर (भीम टायगर अध्यक्ष ) सतिश गुंजाळ (संस्थापक भिम टायगर ) विलास आहेरे, (लोक जनशक्ती पार्टी ) दिपक निकम (अध्यक्ष भारती बौद्ध महासभा ) श्रीकांत निकम, शैलेश निकम,हर्षवर्धन आहिरे, सिद्धार्थ आहिरे,अभिजीत आहिरे मिलिंद पगारे,निलेश आहिरे हेमंत पगारे,अविनाश आहिरे काका निकम,शुभम निकम,चंद्रकांत आहिरे सागर आहिरे आदीनी या निवेदनाद्वारे केली आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News