घरकुल वंचितांसाठी उभी राहणार ग्लोबल स्मार्ट कॉलनी मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाचा पुढाकार..निंबळक व अरणगावला शेतकर्‍यांनी देऊ केल्या पड जमीनी


घरकुल वंचितांसाठी उभी राहणार ग्लोबल स्मार्ट कॉलनी  मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाचा पुढाकार..निंबळक व अरणगावला शेतकर्‍यांनी देऊ केल्या पड जमीनी

अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत) मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने घरकुल वंचितांना घरे मिळण्यासाठी ताबा गुंठा मोहिम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेला निंबळक व अरणगाव येथील शेतकर्‍यांनी प्रतिसाद देऊन खडकाळ पड जमीन देऊ केली आहे. या जमिनीवर घरकुल वंचितांसाठी ग्लोबल स्मार्ट कॉलनी उभारली जाणार असून, 10 टक्के व्यावसायिक जागा सेवानिवृत्त अधिकारी व प्रतिष्ठित नागरिकांना दिली जाणार असल्याची माहिती अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी दिली.  

पंतप्रधान आवास योजना प्रत्यक्षात राबविण्यात केंद्र व राज्य सरकारला अपयश आले आहे. लॅण्ड पुलिंगच्या धर्तीवर भागीदारी तत्त्वाने जागा मालक शेतकरी व लाभार्थींनी गृहनिर्माण सोसायटी निर्माण स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. ताबा गुंठा प्रकल्पाला निंबळक येथील 10 एकर तर अरणगाव व्ही.आर.डी.ई. येथे 8 एकर पड जमीन शेतकर्‍यांनी देऊ केली आहे. या जागेवर ले आऊट प्लॅन टाकून स्मार्ट सोसायटी उभारण्याचा संघटनेचा संकल्प आहे. सदर जागा घरकुल वंचितांना 70 ते 1 लाख रुपये गुंठा दराने मिळणार असल्याचा दावा संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. या जागेच्या 10 टक्के व्यावसायिक जागा माजी प्राचार्य, प्राध्यापक, ज्येष्ठ पत्रकार, डॉक्टर, वकिल, लष्करातील अधिकारी यांनी देण्यात येणार आहे. या जागेचा व्यवहार नियमाप्रमाणे सब रजिस्टारकडे नोंदणीप्रमाणे तर गृहनिर्माण सोसायटीच्या माध्यमातून होणार असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. या घरकुल उभारणीसाठी गृहनिर्माण सोसायटीचे नियंत्रण राहणार असून, या ग्लोबल स्मार्ट कॉलनीसाठी सामाजिक कार्यकर्ते आर्किटेक अर्शद शेख यांचे मार्गदर्शन लाभत आहे. तर यासाठी अ‍ॅड. गवळी, अशोक सब्बन, विलास लामखडे, कॉ.बाबा आरगडे, ओम कदम, विठ्ठल सुरम, हिराबाई ग्यानप्पा, शाहीर कान्हू सुंबे आदि आहेत.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News