कोरोना योद्धा पुरस्कार हा जालिंदर बोरुडे यांच्या कार्याचा सन्मान -चंद्रशेखर भणगे


कोरोना योद्धा पुरस्कार हा जालिंदर बोरुडे यांच्या कार्याचा सन्मान -चंद्रशेखर भणगे

नगर -(प्रतिनिधी संजय सावंत) जालिंदर बोरुडे हे गेल्या अनेक वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रमांद्वारे समाजाहिताचे काम करत आहेत. त्यांचे आरोग्य क्षेत्रातील कार्य उल्लेखनिय असेच  आहे. गोर-गरीबांच्या जीवनात प्रकाशमान ज्योत निर्माण करण्याचे काम प्रामाणिकपणे करत आहेत. मोफत नेत्रतपासणी व मोतीबिंदू शिबीराच्या माध्यमातून त्यांनी लाखो लोकांना दिलेल्या दृष्टी ही त्यांच्या कार्याची  प्रचित होय. कोरोनाच्या संकटकाळातही त्यांनी अडचणीत सापडलेल्या सर्वसामान्यांना  मोफत शिबीराच्या माध्यमातून मोठा  आधार देण्याचे काम केले आहे. त्यांच्या  कामाची राज्यपातळीवर दखल घेऊन देण्यात आलेला कोरोना योद्धा पुरस्कार हा त्यांच्या कार्याचा सन्मान आहे. या सन्मानाने त्यांच्या कार्यात भर पडली  आहे, असे प्रतिपादन श्रीरामपूर येथील अशोक माध्यमिक विद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष चंद्रशेखर भणगे यांनी केले. फिनिक्स फौंडेशनचे अध्यक्ष  जालिंदर बोरुडे यांना महाराष्ट्र हेल्थ फौंडेशन, मुंबई यांच्यातर्फे करोना योद्धा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करतांना श्रीरामपूर येथील अशोक माध्यमिक विद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष चंद्रशेखर भणगे. समवेत  श्री.पप्पूशेठ सोनवणे, श्री.उमेश सुरम, श्री.रवी श्रीगादी आदि.सत्कारास उत्तर देतांना जालिंदर बोरुडे म्हणाले, आपण ज्या समाजात राहतो, त्या समाजाचे आपण काही देणे लागतो ही भावना  ठेवून आपण कार्य करत आहोत. गोर-गरीबांना आरोग्य सेवा मिळावी या हेतूने हे कार्य सुरु आहे. या कार्यात  अनेकांचे मोठे सहकार्य मिळत असते. पुरस्काराने काम करण्यास आणखी प्रेरणा मिळत असते. मित्र परिवाराने केलेला सन्मान बळ देणारा आहे, असे सांगितले.प्रास्तविक पप्पूशेठ सोनवणे यांनी केले  तर उमेश  सुरम यांनी आभार मानले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News