सरकारने न्याय मंदिरे उघडण्याचा निर्णय घ्यावा ! ! अँड.नितीन पोळ


सरकारने न्याय मंदिरे उघडण्याचा निर्णय घ्यावा ! !  अँड.नितीन पोळ

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी.

देशभरातील लॉक डाऊन मोठ्या प्रमाणावर उघडला असून बँका, महसूल कार्यालये सुरू करण्यात आली असून सरकाने न्यायालये उघडण्याचा निर्णय घ्यावा अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे

आपल्या निवेदनात पोळ पुढे म्हणाले की मार्च महिन्यापासून देशभर करोना साथीच्या प्रभावामुळे लॉक डाऊन जाहीर केला.एप्रिल महिन्या पासून राज्यातील सर्व न्यायालये बंद आहेत त्यामुळे राज्यातील सर्व न्यायालयीन कामकाज ठप्प असून दिवाणी व फौजदारी खटले बंद असून अनेक नागरिक न्यायायाच्या प्रतीक्षेत आहेत तर अभूतपूर्व लॉक डाऊन मुळे कोर्ट कामकाज बंद असल्याने अनेक वकिलांची आर्थिक हेळसांड झाली तर अनेक ठिकाणी वकिलांच्या आत्महत्या देखील झाल्या आहेत तर फक्त महत्वाच्या खटल्याचे कामकाज सुरू असल्याने व ते देखील दोन सत्रात सुरू असल्याने वकिलांना एक दोन कामासाठी दिवसभर कोर्टात थांबावे लागत आहे तर दुसऱ्या बाजूला कोर्ट आवारात महत्वाच्या कामाशिवाय प्रवेश नाही व बार रुम व लायब्ररी बंद असल्याने वकिलांना कोर्ट परिसरात बसण्याची सोय देखील नाही त्यामुळे वकिलांची हेळसांड होत आहे

सद्या तरी शासनाने बरीच सरकारी कार्यालये सुरू केली असून कोर्टात न्यायाधीश व वकील यांच्या काम करण्याच्या जागेत व पक्षकार यांच्यात सुरक्षित अंतर ठेवून कामकाज सुरू करता येऊ शकते तसेच अनेक दिवसांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या पक्षकरांना देखील न्याय मिळण्यास मदत होऊ शकते तरी सरकारने योग्य त्या सूचना व मार्गदर्शक नियमावली लागू करून कोर्ट सुरू करण्याचा निर्णय घ्यावा अशी मागणी या निवेदनात केली आहे

जाहिरात
Search
विडिओ
Recent News