चांदेकसारे येथे विवेकभैय्या कोल्हे यांचे हस्ते विविध विकास कामांचा शुभारंभ !!


चांदेकसारे येथे विवेकभैय्या कोल्हे यांचे हस्ते विविध विकास कामांचा शुभारंभ !!

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी.

कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथे विविध विकास कामाचे भुमिपुजन कोपरगाव औद्योगिक वसाहतीचे चेअरमन तसेच संजीवनी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले.

 या प्रसंगी सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे संचालक संजय हो न माजी सरपंच केशवराव होन,सरपंच पूनमताई खरात, उपसरपंच विजय होन ॲड.ज्ञानेश्वर होन,रावसाहेब पाटील होन,किरण होन,दिलीपराव होन ,ग्रामविकास अधिकारी प्रल्हाद सुकेकर यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

चांदेकसारे येथे के १४ व्या वित्त आयोगा अर्तगत ग्रामविकास निधितील ३४ लाख ९ हजार रूपये खर्चाची, चांदेकसारे आनंदवाडी,दयानंदवाडी व झगडेफाटा येथे बंदिस्त गटार,महीला सार्वजनिक शौचालय,तसेच पथदिवे लावणे, यासारखी विविध विकास कामे करण्यात येणार असल्याची माहीती उपसरपंच विजय होन यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली.

सदर प्रसंगी बोलताना विवेक भैया कोल्हे म्हणाले की, माजी आमदार स्नेहलता ताई कोल्हे व संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांचा मार्गदर्शनाखाली चांदेकसारे  ग्रामपंचायतीने माजी सरपंच केशवराव होन यांच्या पुढाकाराने अंत्यविधीसाठी साहीत्य दिले असुन् परीक्षेत उज्वल यश संपादन करणाऱ्या गुणवंत विधार्थीचा सत्कार तसेच अंगणवाडीस अन्न शिजवण्यासाठी लागणारे भांडे देणे,असे विविध सामाजिक उपक्रम राबवुन कोपरगाव तालुक्यात नावलौकीक मिळवला असल्याचे सांगत विवेक कोल्हे यांनी कामाचे कौतुक केले.

माजी आमदार स्नेहलता ताई कोल्हे व संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली गावाचा विकास हेच आपले ध्येय असुन त्या ध्येयपुर्तीसाठी आपण सदैव तत्पर रहाणार असल्याचे माजी सरपंच केशवराव होन यांनी यावेळी सांगीतले शेवटी ॲड.ज्ञानेश्वर होन यांनी उपस्थितांचे आभार मानले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News