काँग्रेसचा महात्मा गांधी पुतळ्यासमोर बैठा सत्याग्रह ; हाथरस घटना अत्यंत निंदनीय, मोदी- योगी सरकार असंवेदनशील- आ. डॉ. सुधीर तांबे


काँग्रेसचा महात्मा गांधी पुतळ्यासमोर बैठा सत्याग्रह ;   हाथरस घटना अत्यंत निंदनीय, मोदी- योगी सरकार असंवेदनशील- आ. डॉ. सुधीर तांबे

अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस आणि अहमदनगर जिल्हा काँग्रेसच्या वतीने भारतीय जनता पार्टीच्या योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेश सरकारच्या वतीने अतोनात छळ केलेल्या हाथरस प्रकरणामधील पिडीत दलित दलित भगिनीस न्याय मिळावा यासाठी अहमदनगर शहरातील महात्मा गांधी पुतळ्या समोर बसून काँग्रेसच्या ज्येष्ठ पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सत्याग्रह केला. यावेळी विधानपरिषदेचे आ. डॉ. सुधीर तांबे साहेब, आ. लहु कानडे, अहमदनगर शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे, अहमदनगर ग्रामीण जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, जिल्हा समन्वयक ज्ञानदेव वाफारे, जेष्ठ नेते दीप चव्हाण, अल्पसंख्यांक विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष अज्जूभाई शेख आदी सह पदाधिकारी सहभागी झाले होते.

नगर : (प्रतिनिधी संजय सावंत) हाथरस मध्ये घडलेली घटना ही अत्यंत निंदनीय आहे. देशातील मोदी, उत्तर प्रदेश योगी सरकार असंवेदनशील आहे, अशी टीका काँग्रेसचे आ.डॉ.सुधीर तांबे यांनी केली आहे  काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री ना.बाळासाहेब थोरात यांच्या आदेशावरून नगर शहरातील महात्मा गांधी पुतळ्यासमोर बसून बैठा सत्याग्रह करण्यात आला. यावेळी आ.तांबे बोलत होते. यावेळी श्रीरामपूरचे आ. लहु कानडे, अहमदनगर शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे, अहमदनगर ग्रामीण जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, जिल्हा समन्वयक ज्ञानदेव वाफारे, जेष्ठ नेते दीप चव्हाण, अल्पसंख्यांक विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष अज्जूभाई शेख, विद्यार्थी शहर जिल्हाध्यक्ष दानिश शेख, पारनेर तालुका अध्यक्ष संभाजीराव रोहोकले, शेवगाव तालुका अध्यक्ष अमोल फडके आदी उपस्थित होते.यावेळी बोलताना आ. तांबे म्हणाले की, हाथरस मध्ये घडलेली घटना ही अत्यंत अमानवी आहे. क्रूर आहे. या घटनेमध्ये मोदी - योगी सरकार बेजबाबदारपणे वागत आहे. कुठली ही संवेदनशीलता या सरकारची नाही. सरकार पीडितेच्या कुटुंबीयांनी भेटू देत नाही. चार दिवस झाले तरी एफआरआय घेत नाही. बलात्कार झालाच नाही असा दावा भाजप करत आहे. यावरून या प्रकरणाबद्दलच्या भाजपच्या भावना काय आहेत हे उघडे पडले आहे. तांबे म्हणाले की, आरोपींच्या समर्थनार्थ भाजप आमदार उतरतात हे चुकीचे आहे. पीडितेला न्याय मिळाला पाहिजे ही काँग्रेसची मागणी आहे. पंतप्रधान मोदी - मुख्यमंत्री योगी यांचा आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने निषेध करतो. राहुल गांधी, प्रियंका गांधी यांना दिलेली वागणूक ही देखील निषेधार्हच आहे. यावेळी बोलताना आ.लहू कानडे म्हणाले की, देशात भाजपचे ज्या - ज्या ठिकाणी राज्यात सरकार आहे आणि केंद्रांमधील मोदी सरकार आल्यापासून देशात दलितांवरील बलात्कारांच्या, त्याच बरोबर अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहेत. हे अत्यंत सूचक आहे. धार्मिक उन्माद घडवून आणत पुन्हा एकदा मध्ययुगातील वर्ण व्यवस्था निर्माण करण्याचे षड्यंत्र हे सरकार करीत आहे.आ. तांबे पुढे म्हणाले की, देशातील दलितांवर झालेला अन्याय हा अन्याय नाहीच अशी त्यांची भूमिका आहे. हे निर्दयीपणाचे वर्तन. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून दिलेला समता, बंधुतेचा संदेश पायदळी तुडवली जात आहे. संविधान नाकारण्याची प्रवृत्ती केंद्राची असून यामागे षडयंत्र आहे. भाजपचा खरा चेहरा या देशातील जनतेसमोर आता उघड होत आहे.यावेळी शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंखे, जिल्हा समन्वयक ज्ञानदेव वाफारे, जेष्ठ नेते दीप चव्हाण आदींची भाषणे झाली. शानूभाई शेख, इम्रान बागवान, गुड्डूभाई शेख, चिरंजीवभाऊ गाढवे, नलिनीताई गायकवाड, प्रवीण गीते पाटील, स्वप्नील पाठक, अक्षयभाऊ कुलट, अमित भांड, विशाल कळमकर, प्रमोद अबुज, शंकर आव्हाड यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी सत्याग्रहात सहभागी झाले होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News