दलित महासंघाच्या वतीने दलित तरुणीवर झालेल्या बलात्कार घटनेचा निषेध!! आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी


दलित महासंघाच्या वतीने  दलित तरुणीवर झालेल्या बलात्कार घटनेचा निषेध!! आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी

उत्तर प्रदेशातील हाथरस मध्ये दलित तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेचा दलित महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध नोंदविताना संघटनेचे प्रदेशाध्यक्ष काशीनाथ सुलाखे पाटील, जिल्हाध्यक्ष संजय चांदणे, कडूबाबा लोंढे, सलिम सय्यद, निलेश चांदणे, चंद्रकांत सकट, रफिक शेख, प्रमोद शेंडगे, विशाल भालेराव, प्रकाश काळोखे, अक्षय कांबळे, प्रविण कांबळे, सुभाष भागवत आदि. (छाया-वाजिद शेख-नगर)

अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत -) उत्तर प्रदेशातील हाथरस मध्ये दलित तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेचा दलित महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध नोंदविण्यात आला. या प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात होऊन आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी व आरोपींना पाठीशी घालणार्‍या उत्तर प्रदेशातील संबंधीत सर्वच खात्यातील अधिकार्‍यांना सहआरोपी करण्याची मागणी करण्यात आली. तर योगी व मोदी सरकारच्या काळात दलितांवर अत्याचार वाढल्याचा आरोप करण्यात आला. यावेळी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष काशीनाथ सुलाखे पाटील, जिल्हाध्यक्ष संजय चांदणे, कडूबाबा लोंढे, सलिम सय्यद, निलेश चांदणे, चंद्रकांत सकट, रफिक शेख, प्रमोद शेंडगे, विशाल भालेराव, प्रकाश काळोखे, अक्षय कांबळे, प्रविण कांबळे, सुभाष भागवत आदि उपस्थित होते.

उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यातील चंदपा येथे राहणार्‍या दलित तरुणीवर सामूहिक बलात्काराची घटना घडली. आपल्या आईसोबत तरुणी शेतात चारा गोळा करण्यासाठी गेली असता तिच्यावर चार नराधमांनी अत्याचार करून तिची जीभ कापून, पाठीच्या कण्याचे हाड मोडून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. पीडित तरुणीला उपचारासाठी अलीगढच्या जेएन मेडिकल रुग्णालय व सफदरजंग रुग्णालयात उपचार करण्यात आले. मात्र उपचार सुरु असताना या पीडित तरुणीचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळून देखील उत्तरप्रदेश पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला नव्हता. पिडीत तरुणीच्या कुटुंबीयांना मारहाण करण्यात आली. तर तेथील जिल्हाधिकारी यांच्या चुलत्यांना धमकावले असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. तसेच पोलिसांनी पीडितेचा मृतदेहावर त्यांच्या नातेवाईकांना न सांगता गुपचूप त्यावर अंत्यसंस्कार करुन उत्तरप्रदेश सरकारने लोकशाही पायदली तुडवून हुकुमशाही निर्माण केली असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News