अखिल भारतीय प्राइवेट कर्मचारी कल्याण असोसिएशन च्या उत्तर महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्षपदी राजमोहंमद शेख यांची निवड


अखिल भारतीय प्राइवेट कर्मचारी कल्याण असोसिएशन च्या उत्तर महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्षपदी राजमोहंमद  शेख यांची निवड

शेवगाव प्रतिनिधी सज्जाद पठाण, असोसिएशन च्या उत्तर महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष पदी राजमोहंमद  शेख यांची निवड असोसिएशन चे राष्ट्रीय अध्यक्ष मा. चंद्रजीत यादव (यु. पी.) व राष्ट्रीय महासचिव उबेद शेख (दिल्ली) व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अमीर खान (मुंबई) यांच्या नेतृत्वाखाली भारत भर गरुड झेप घेत असलेल्या भारतातील प्रत्येक राज्यातील प्राइवेट कर्मचारी यांच्या पाठीशी खंबीर पणे उभे राहणाऱ्याअखिल भारतीय प्राइवेट कर्मचारी कल्याण असोसिएशनच्या उत्तर महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष पदावर सा. राजरिपोर्टर चे संपादक व महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष राजमोहंमद  शेख यांची निवड झाली असून राष्ट्रीय महासचिव उबेद शेख (दिल्ली )व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अमीर खान (मुंबई) यांनी या बाबतचे नियुक्ती पत्र प्रदान केले.

        राजमोहंमद शेख यांच्या निवडीबद्दल महाराष्ट्र प्रदेश सचिव मा. बरकतअली शेख तसेच अहमदनगर, धुळे, नाशिक, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यातून अब्दुल्ला भाई चौधरी, ईदरीस भाई शेख, किशोर गाढे, बी. के. सौदागर, शेख फकीर मोहम्मद, सुभाषराव गायकवाड, गुलाब भाई वायरमन, कलीम भाई शेख, उस्मानभाई शेख, मन्सूर पठाण, सुखदेव केदारे, कॉ. सुरेश पानसरे, हनीफ शेख, दस्तगीर शाह, सज्जाद पठाण, आदींनी त्यांचे अभिनंदन केले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News