खराब झालेल्या काटवन खंडोबा रस्त्याला दिले खासदारांचे नाव!! शिवसेनेतील गटबाजीचा काटवन रस्त्याला नितीन भुतारे यांचा आरोप


खराब झालेल्या काटवन खंडोबा रस्त्याला दिले खासदारांचे नाव!! शिवसेनेतील गटबाजीचा काटवन रस्त्याला नितीन भुतारे यांचा आरोप

अहमदनगर (प्रतिनिधी  संजय सावंत) 

महाराष्ट्र नवनिर्मान सेनेच्या वतीने वारंवार मागणी करुनही काटवन खंडोबा रोड ची दुरुस्ती होत नसल्यामुळे या रस्त्याच्या खराब झालेल्या परिस्थीतला खासदार सुजय विखे हेच जबाबदार असल्या मुळे या खराब रस्त्याचे खासदार मार्ग असे नामकरण मनसेच्या वतीने करण्यात आले 2 वर्षापासून सदर रोड ला निधी देणार असे पत्र खासदार सुजय विखे यांनी महानगरपालिका आयुक्तांकडे  दिले. परंतु आज पर्यंत खासदार सुजय विखे यांनी कुठलाही निधी या रोड करीता दिलेला नसुन उलट दलित वस्ती निधीतुन हा रोड दुरुस्ती होणार होता. त्या कामाची मंजुरी 31/10/2018 रोजी देण्यात आली होती परंतु स्थनिक शिवसेना नगरसेवकांनी हे काम उपायुक्तांवर दबाव आणुन 09/09/2019 रोजी पत्र देऊन बंध पाडले . व खासदार या रोड ला निधी देणार होते परंतु   शिवसेनेच्या 4 नगरसेवकांची अंतर्गत गटबाजी मुळे हा रोड थांबल्या मुळे या भगितिल नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्या मुळे महाराष्ट्र नवनिर्मान सेनेने आज खासदार मार्ग असे नामकरण करून आंदोलन करावे लागले.

हा रस्ता खासदार निधीतुन करावा किंव्हा दलित वस्ती निधीतुन करावा हा महानगर पालिकेचा प्रश्न असुन महानगर पालिका आयुक्तांनी हा काटवन खंडोबा रोडचे काम ताबडतोप मार्गी लावावे अन्यथा मनसेच्या वतीने नविन टिळक रोड ते नेप्ती नका चौकापर्यंत च्या रोड वर रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा ईशार नितीन भुतारे यांनी दिला आहे. या आंदोलनात मनसेचे जिल्हाध्यक्ष्य सचिन डफळ, मनोज राऊत, गजेन्द्र राशिनकर, अॅड अनिता दिगे, विनोद काकडे, दिपक दांगट, पोपट पाथरे, अशोक दातरंगे, तुषार हिरवे, गणेश शिंदे, अमोल बोरुडे, आकाश कोल्हाळ, अनिकेत जाधव, अंबादास गोटीपामुल आदी उपस्थित होते

जाहिरात
Search
विडिओ
Recent News