मराठा आरक्षणाच्या कायदेशीर अडचणी सोडविण्यासाठी सरकार प्रयत्नशील –आ. आशुतोष काळे


मराठा आरक्षणाच्या कायदेशीर अडचणी सोडविण्यासाठी सरकार प्रयत्नशील –आ. आशुतोष काळे

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासह विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार योगेश चंद्रे यांना देतांना आमदार आशुतोष काळे,समवेत शिवसेना उत्तर नगर जिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे व मराठा समाज बांधव.

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी.

            मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे या मराठा समाज बांधवांच्या विचारांशी महाविकास आघाडी सरकार सहमत आहे. मराठा आरक्षणाच्या कायदेशीर अडचणी सोडविण्यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे.त्याबाबत सरकारच्या वतीने न्यायालयात योग्य माहिती मांडणार असून याबाबत लवकरच सकारात्मक तोडगा निघेल असा आशावाद आमदार आशुतोष काळे यांनी व्यक्त केला.

         सकल मराठा समाजाच्या वतीने तहसील कार्यालय कोपरगाव येथे मराठा आरक्षण व इतर मागण्यांसाठी करण्यात आलेल्या ढोल बजावो आंदोलनात आमदार आशुतोष काळे सहभागी झाले होते याप्रसंगी ते बोलत होते.यावेळी सकल मराठा समाजाच्या विविध मागण्यांचे निवेदन त्यांच्या हस्ते तहसीलदार योगेश चंद्रे यांना देण्यात आले.यावेळी शिवसेनेचे उत्तर नगर जिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे,शिवसेना शहराध्यक्ष कलविंदर डडियाल, भरत मोरे,अशोक आव्हाटे, बाळासाहेब रुईकर,राजेंद्र वाकचौरे,राजेंद्र आभाळे, अनिरुद्ध काळे,तुषार सरोदे, विनय भगत,अमित आढाव, दिनेश पवार,रमेश कुहिरे,गणेश पवार,नितीन शेलार,शुभम लासुरे, किशोर डोखे,लवेश शेलार,प्रतीक पाटील,सुनील साळुंके,अमोल शेलार, दादा आवारे,ओम मोरे, रवींद्र कथले,लक्ष्मण सताळे, गिरीधर पवार,डॉ.शिवाजी रोकडे, उमेश देवकर व मराठा समाजबांधव उपस्थित होते.


           

जाहिरात
Search
विडिओ
Recent News