अ.भा.वारकरी मंडळाच्या नूतन कार्यकारिणीचा सत्कार!! संत विचारांचा प्रचार व प्रसार व्हावा-तुळशीराम लबडे महाराज


अ.भा.वारकरी मंडळाच्या नूतन कार्यकारिणीचा सत्कार!! संत विचारांचा प्रचार व प्रसार व्हावा-तुळशीराम लबडे महाराज

जेऊर येथील श्री सिद्धनाथ दत्त मंदिरात अ.भा.वारकरी मंडळाच्या नूतन तालुका कार्यकारिणीचा सत्कार करण्यात आला.(छाया -अमोल भांबरकर)                                 

नगर( प्रतिनिधी संजय सावंत) -संत तुकाराम महाराज,संत श्री ज्ञानेश्वर,संत नामदेव महाराज यांच्या विचार संत साहित्याच्या,अभांगाच्या,कीर्तनाच्या माध्यमातून प्रकट झाले आहे.या संतांच्या विचारांवरच देव,देश आणि धर्म टिकून आहे.जगाला शांतीचा संदेश देणारे पसायदान हे संत श्री ज्ञानेश्वर माउलींनी सांगितले आहे.समाजात संत विचारांचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठी अ.भा.वारकरी मंडळ कार्यरत आहे.दत्त संप्रदाय,भागवत संप्रदाय,नाथ संप्रदाय, चैतन्य संप्रदाय असे अनेक संप्रदाय आहेत.संतांनी सर्वांचा एकत्रीकरण करून वारकरी संप्रदाय केला आहे.वारकरी संप्रदाय हा सर्वष्रेष्ठ आहे.समाजातील द्वेष भावना दूर करून सर्व संप्रदायाला एकत्र करणे यासाठी सर्वानी कार्य करावे.असे प्रतिपादन अ.भा.वारकरी मंडळाचे शहराध्यक्ष भागवताचार्य ह.भ.प.तुळशीराम लबडे महाराज यांनी केले. वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश महाराज बोधले,देवगड देवस्थानचे महंत ह.भ.प. भास्करगिरी महाराज,ह.भ.प.बाळकृष्ण महाराज भोंदे,प्रदेशाध्यक्ष अनिल महाराज वाळके, जिल्हाध्यक्ष गणेश महाराज डोंगरे,यांच्या शिफारशीने अ.भा.वारकरी मंडळाची नगर तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.जेऊर येथील श्री सिद्धनाथ दत्त मंदिरात या नूतन कार्यकारिणीचा सत्कार सोहळा पार पडला.वारकरी मंडळाचे शहराध्यक्ष भागवताचार्य ह.भ.प.तुळशीराम लबडे महाराज यांच्या हस्ते शाल श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन मंडळाच्या नूतन सदस्यांचा सत्कार करण्यात आला.याप्रसंगी लबडे महाराज बोलत होते.यावेळी तालुकाध्यक्ष रामायणाचार्य अमोल महाराज सातपुते,कोषाध्यक्ष ह.भ.प.सुदाम महाराज दारकुंडे,मुख्यसचिव बालयोगी अमोल महाराज जाधव,सार्वजनिक मंदिरसमिती उपप्रमुख विजय भालसिंग,सप्ताह व दिंडी समिती प्रमुख ह.भ.प.वसंत महाराज शेजूळ,युवासमिती उपप्रमुख ओंकार महाराज शिर्के,व्यसनमुक्ती सचिव सोमनाथ शिंदे,गोपालनसमिती प्रमुख ह.भ.प.बापू महाराज भगत,गोपालनसमिती सचिव ह.भ.प.रोहिदास महाराज जाधव,महिला बालकल्याण समिती प्रमुख ह.भ.प.हिराताई महाराज मोकाटे, महिला बाल कल्याण समिती उपप्रमुख लंकाताई महाराज वाघ,महिला बालकल्याण समिती सचिव शैलजाताई महाराज मुळे, ह.भ.प.लक्ष्मण गव्हाणे,ह.भ.प. छगन महाराज मोकाटे,गोरक्षनाथ काळे, अप्पा बनकर,राजू तोडमल,संजय बनकर,सुभाष पवार,सुनील गोरे,भानुदास मगर,बाबासाहेब पवार,राजू पेहेरे, नामदेव पावले,वकील शिंदे,माजी सैनिक बाळासाहेब विधाते,जय मातादी ग्रुपचे अध्यक्ष बाबासाहेब मगर आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी ह.भ.प.रोहिदास महाराज जाधव म्हणाले की,समाज प्रबोधन व कीर्तन करणारे कीर्तनकारांना शासनाने निवृत्तीनंतर पेन्शन सुरु करावी.तसेच वारकरी संप्रदायाला राजाश्रय मिळावा यासाठी अ.भा.वारकरी मंडळ प्रयत्नशील आहे,                            ह.भ.प.हिराताई महाराज मोकाटे म्हणाल्या कि,वारकरी संप्रदाय हा सर्वस्रेष्ट आहे.येथे लहान मोठा कोणीही नाही सर्वाना एकत्र घेऊन सहकार्याने काम करावे.                                             ह.भ.प.अमोल महाराज सातपुते म्हणाले कि,ग्रामस्तरावर ही गावोगावी वारकरी समिती होणार आहे. कि जेणेकरून वृद्धाश्रम बंद व्हावेत.मुलांसाठी संस्कार शिबिरे व्हावीत,वृक्षारोपण,गोपालन तसेच सप्ताह व दिंडीचे आयोजन व्हावे.समाजमध्ये चांगले विचार रुजावेत हाच उद्देश आहे.           सूत्र संचालन सुदाम महाराज दारकुंडे तर आभार ओंकार महाराज शिर्के यांनी मानले.          

                                                                             

जाहिरात
Search
विडिओ
Recent News