धामोरी गावाला समता सैनिक दलाची भेट शांतता व समता प्रस्थापित करण्याचे केले आवाहन !!


धामोरी गावाला समता सैनिक दलाची भेट शांतता व समता प्रस्थापित करण्याचे केले आवाहन !!

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी.

कोपरगाव तालुक्यातील लोकसंख्येच्या दृष्टीने मोठे असलेले धामोरी गावातील काही खोडसळ मनुवादी वृत्तीच्या मनोरूग्न असलेल्या समाजकंटकाने सार्वजनिक स्वछतागृहा मध्ये विश्वरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यानावाने आक्षेपार्ह  लिखाण करून विटंबना केलेच्या निषेधार्थ 4 ऑक्टोबर 2020 रोजी समता सैनिक दलाच्या अहमदनगर युनिट च्या वतीने धामोरी गावातील बौद्ध वस्तीला भेट दिली व निषेध सभा घेऊन शांतता व समता प्रस्थापित करण्याचे आवाहन करून कोपरगाव ग्रामीण पोलीस अधीक्षक व धामोरी गावचे सरपंच यांना निवेदन दिले.

 काल दिनांक 3ऑक्टोबर रोजी गावातील काही जातीवादी मनुवादी वृत्तीच्या लोकांनी धामोरी गावातील मध्य ठिकाणी असलेल्या सार्वजनिक स्वछतागृहात महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचे आक्षेपार्ह  लिखाण केले होते संबंधित बाब गावातील काहींच्या सौच विधीस गेल्यावर लक्ष्यात आल्यावर त्यांनी या घटनेची कोपरगाव पोलीस स्टेशन ला तक्रार दाखल केली.त्यानंतर गावातील प्रमुखांची बैठक घेऊन गाव दोन दिवस बंद ठेवण्यात आले होते परंतु अद्यापही आरोपीला अटक झालेली नसल्याने आज दिनांक 4 रोजी समता सैनिक दलाच्या अहमदनगर युनिट च्या वतीने धामोरी गावाला भेट देऊन पोलीस अधीक्षक अनिल कटके व धामोरी गावाचे सरपंच भाकरे यांना अश्या विटंबना करणार्‍या आरोपीला कडक शासन करुन कारवाई करून त्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा या मागणीचे निवेदन देण्यात आले.समता सैनिक दलाचे नगर जिल्हा प्रमुख माजी पोलीस अधीक्षक के.पी रोकडे यांनी अशा खोडसाळ प्रकार करणार्‍यांना धडा शिकवला पाहिजे अशा प्रवृत्तीची लोक एका समाजाला नाही तर सर्वच समाजाला घातक आहेत असे प्रतिपादन केले तर तालुका प्रमुख 

शांताराम रणशूर यांनी ग्रामस्थांनी शांतता राखावी असे अवाहन केले.आणि अशा समाज घातक औलादी ठेचुन काढल्या पाहिजे आरोपी पकडला तर त्याला कडक शासन करा अन्यथा उग्र अंदोलन करु असा इशारा दिला.तसेच सैनिक दलाचे जिल्हा युनिट चे राजेंद्र मेहेरखांब सर, व पत्रकार सिद्धार्थ मेहेरखांब यांनी कठोर शब्दात निषेध व्यक्त केला तर शाहीर सोनवणे व विजय गायकवाड यांनी गीताच्या माध्यमातून तिव्र शब्दात निषेध व्यक्त केला.

       या प्रसंगी समता सैनिक दलाचे संदीप मेहेरखांब,गौतम गोडगे,सुशांत पवार,विशाल लोंढे,सिद्धार्थ राजेंद्र मेहेरखांब व धामोरी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.तर निषेध कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सैनिक अरुण लोंढे यांनी केले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News