मराठा समाजाच्या वतीने आरक्षणासाठी" रास्ता रोको" आंदोलन


मराठा समाजाच्या वतीने आरक्षणासाठी" रास्ता रोको" आंदोलन

नानासाहेब मारकड भिगवण (प्रतिनिधी) इंदापूर तालुका मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाला आरक्षण मिळणेकरीता रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर एक तासाहून अधिक काळ रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी मराठा समाजाच्या मागण्याचे निवेदन मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने शासन प्रतिनिधी उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर  व मंडलअधिकारी मकरंद तांबडे यांना देण्यात आले. 

    सदर निवेदनामध्ये सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा विषय घटनापीठाकडे सपुर्त करु स्थागिती आदेश दिल्याने मराठा समाजामध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. सदर आरक्षणाबाबत कायदेशीर तद्न्यांचा सल्ला घेउन स्थगिती उठविण्यात यावी व मराठा आरक्षण खंडीत होवु न देता  पुर्ववत चालु ठेवन्यात यावे.ही मोर्चाची प्रमुख मागणी होती. या आंदोलनात तालुक्यातील सर्व पक्षीय नेते ,मराठा समाज बांधव आणि महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

यावेळी आंदोलकानी " एक मराठा लाख मराठा" " कोन म्हणतय देनार नाही घेतल्याशिवाय राहणार नाहीत" " आरक्षण आमच्या हक्काच नाही कोणाच्या बापाच." या घोषणानी परीसर दुमदुमून गेला होता यावेळी आनेक मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त केले. आमच्या मागण्याचा सरकारने सहानुभूती पुर्वक विचार केला नाही तर् यापुढील काळात मराठा समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येइलअसा इशारा आंदोलनकर्त्यानी यावेळी दिला.

पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर भिगवण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांनी  आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडला नाही आंदोलन शांततेत पार पडले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News