लिंगाळी येथे अज्ञात व्यक्तीने केली फोटोग्राफरची हत्या, पोलीस घटना स्थळी दाखल, नागरिकांनी संयम राखा-पो नि सुनिल महाडिक


लिंगाळी येथे अज्ञात व्यक्तीने केली फोटोग्राफरची हत्या, पोलीस घटना स्थळी दाखल, नागरिकांनी संयम राखा-पो नि सुनिल महाडिक

विठ्ठल होले पुणे, दौंड 

 दौंड प्रतिनिधी - दौंड शहरातील  प्रसिद्ध फोटो ग्राफर पिंटू उर्फ केदार भागवत यांची हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे.दौंड तालुक्यातील लिंगाळी गावच्या हद्दीतील केनोल शेजारी पिंटू उर्फ केदार भागवत वय 46   यांची हत्या झाली असल्याचे दौंड पोलीस स्टेशन येथे कळवले,त्यानुसार दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर याना घटनेची माहिती देऊन तातडीने घटना स्थळी जाऊन पाहणी केली असता सदर व्यक्तीच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या केल्याचे  दिसले,त्याठिकाणी हत्या करण्यासाठी वापरलेला दगड आणि दारूच्या बाटल्या मयताच्या शेजारी पडल्या होत्या,कोणत्यातरी अज्ञात कारणावरून अज्ञात व्यक्तीने हत्या केली आहे,या हत्येमुळे दौंड शहरात खळबळ उडाली आहे,तर्क वितर्क करत चर्चेला उधाण आले आहे, परंतू पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी हत्येचा तपास सर्व शक्यता पडताळून केला जाणार आहे  जनतेने अफवा पसरवू नये,तसेच पोलीस लवकरच हत्येचे कारण आणि आरोपी शोधून  काढतील तेव्हा अशावेळी संयम राखणे आवश्यक आहे असे आवाहन  पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी केले आहे. यावेळी   प्रभारी उपविभागीय अधिकारी नारायण शिरगावकर  पोलीस  निरीक्षक सुनील महाडिक,पोलीस उपनिरीक्षक अमृता काटे,ASI दिलीप भाकरे,पो ना धनंजय दाभाडे, धनंजय गाढवे,सचिन बोराडे,अमोल गवळी घटनास्थळी दाखल होते.  सदर माहिती हाती आली तेव्हा  अज्ञात मारेकर्‍या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे सुरू होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News