रेशन दुकानांतील बायोमेट्रिक मशीन काही काळ बंद करावे !!संतोष काजळे


रेशन दुकानांतील बायोमेट्रिक मशीन काही काळ बंद करावे !!संतोष काजळे

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी.

 शासनातर्फे स्वस्त धान्य दुकानात वाटप करण्यात येणारे धान्य ग्राहकांना वाटपावेळी बायोमेट्रिक मशीन द्वारे बोटांचे ठसे घेऊन वाटप करण्यात येते ती पद्धत कोरोना महामारी संपेपर्यंत बंद करून ओळखपत्र बघून धान्य वाटप करण्यात यावे असे निवेदन करंजी येथील जयभवानी तरुण मंडळाचे अध्यक्ष संतोष काजळे यांनी करंजी ग्रामपंचायत यांना दिले.

   हे निवेदन देते वेळी जय भवानी मित्र मंडळचे उपाध्यक्ष हौशिराम भिंगारे, शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना संजीवनी चे संचालक भास्कर भिंगारे,करंजी सोसायटी चेअरमन कारभारी आगवण,उपसरपंच रविंद्र आगवण सुवर्ण संजीवनी चे  संचालक विकास शिंदे,अमृत संजीवनी चे संचालक देवीदास भिंगारे,शेतकरी संघाचे संचालक अरूण भिंगारे,गोरख भिंगारे, सुनिल भिंगारे,भाउसाहेब शहाणे,तुकाराम आगवण,कृष्णा शहाणे,चंद्रकांत शेळके तसेच करंजी ग्रामस्त व जय भवानी मित्र मंडळ करंजी बु.चे सर्व कार्यकर्ते हजर होते.

  या  निवेदना द्वारे त्यांनी प्रशासनाला विनंती केली आहे  की सध्या कोपरगाव तालुक्यात देखील गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे तालुक्यातील सर्व शासकीय विभागातील अधिकारी आपआपल्या परीने परिस्थिती आटोक्यात ठेवण्यासाठी अहोरात्र प्रयन्त करतांना दिसंत आहे. या बायोमेट्रिक मशीन द्वारे कोरोना चा प्रसार अधिक वाढू शकतो त्यामुळे राज्यभरातील  सर्व शासकीय किंवा निमशासकीय कामे करताना कुठेच बायोमेट्रिक मशीनचा वापर केला जात नसताना फक्त गरिबांना पोट भरण्यासाठी देण्यात येणाऱ्या स्वस्त ध्यान्य दुकानातच का बायोमेट्रिक मशीनचा वापर केला जातो असा सवाल या वेळी उपस्थित होतो.या प्रकारामुळे कोरोनाचा प्रसार होण्यास अजून वाव मिळू शकतो तरी लवकरात लवकर प्रशासनाने यावर निर्णय घ्यावा अश्या मागणीचे निवेदन करंजी ग्रामपंचायतीला देण्यात आले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News