दुचाकी चोरी करणारी सराईत टोळी जेरबंद ; कोतवाली पोलिसांची कारवाई


दुचाकी चोरी करणारी सराईत टोळी जेरबंद ; कोतवाली पोलिसांची कारवाई

अहमदनगर, (प्रतिनिधी संजय सावंत) नगर व जिल्हातून - दुचाकी चोरीच्या तपासादरम्यान जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून पकडण्यात आलेल्या आरोपींकडून विविध कंपन्यांच्या २५ चाकी हस्तगत करण्यात आले आहेत. कोतवाली पोलिसांनी आठ दिवसा पासुन अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पथक तयार करून आरोपींना शोधत घेत होते. आरोपी कडून माहिती घेऊन गाड्यांचा तपास लावला. कोतवाली पोलिसांनी कारवाई केली असून हस्तगत दुचाकीमध्ये कोणाच्या असल्यास त्यांनी पोना गणेश धोत्रे (मो.9967913069) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील अप्पर पोलीस अधीक्षक सागर पाटील नगर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली चे पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे सपोनि नितीन रणदिवे यांनी दिलेल्या सूचनेनुसार पोना गणेश धोत्रे, नितीन शिंदे, शाहिद शेख, पोकाॅ बापूसाहेब गोरे, भारत इंगळे, प्रमोद लहारे, सुजय हिवाळे, प्रशांत राठोड आदींच्या पथकाने ही मोठी कारवाई केली

जाहिरात
Search
विडिओ
Recent News