पोलिस उपाधिक्षक संदीप मिटके यांचा श्री संत सावता माळी युवक संघाच्यावतीने सत्कार


पोलिस उपाधिक्षक संदीप मिटके यांचा श्री संत सावता माळी युवक संघाच्यावतीने सत्कार

पोलिस उपाधिक्षक संदीप मिटके यांचा "महाराष्ट्रची शान" पुरस्काराने सन्मान झाल्याबद्दल त्यांचा संत सावता माळी युवक संघाच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष अशोक तुपे, जालिंदर बोरुडे, लवेश गोंधळे, रोहन गाडेकर  आदी. (छाया : राजू खरपुडे ,नगर )   

संदिप मिटके यांचे कार्य समाजासाठी दिशादर्शक -अशोक तुपे

नगर -(प्रतिनिधी संजय सावंत) कोरोना महामारीमुळे सर्वत्र लोकडाऊन असताना नगर मधील खाकी वर्दीतील एक पोलीस उपाधिक्षक सामाजिक बांधिलकी म्हणून स्वयंसेवी संस्थाच्या मदतीने गरजूंना विविध प्रकारची मदतीसाठी धावून आला. गरजूंना किराणा साहित्य वाटप ,अन्न छत्र ची पाकिटे वाटप, मुके प्राणी यांना चारा वाटप केले. तसेच परप्रांतीयांना त्यांच्या राज्यात पोहचविण्यासाठी महत्वपूर्ण जबाबदारी पार पाडली. नगर मधील धार्मिक सण उत्सव आदींच्या माध्यमातून पोलिस विषयी नागरिकांच्या मनात चांगली प्रतिमा निर्माण केलेले पोलिस उपाधिक्षक संदीप मिटके यांचा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एकदा नव्हे तर तीन वेळेस त्यांचे अभिनंदन केले. अशा या पोलिस उपाधीक्षक असलेले संदीप मिटके यांचा एका वृत्त वाहिनीने दखल घेऊन त्यांना "महाराष्ट्राची शान" पुरस्काराने गौरव केला याचा सर्वांनाच अभिमान आहे. त्यांचे हे कर्तव्यापलिकडील कार्य समाजासाठी दिशादर्शक असेच आहे. अशा चांगल्या अधिकार्‍यामुळे समाजात एकोपा, मदतीची भावना आणि पोलिसांबद्दल विश्‍वास निर्माण होण्यास मदत होणार आहे, असे प्रतिपादन श्री संत सावता माळी युवक संघाचे जिल्हाध्यक्ष अशोक तुपे यांनी केले.

     पोलिस उपाधिक्षक संदीप मिटके यांचा "महाराष्ट्रची शान" पुरस्काराने सन्मान झाल्याबद्दल त्यांचा संत सावता माळी युवक संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष अशोक तुपे, जालिंदर बोरुडे, लवेश गोंधळे, रोहन गाडेकर  आदी उपस्थित होते.

     यावेळी पोलिस उपाधिक्षक संदिप मिटके म्हणाले, पोलिसांचे कर्तव्यच आहे की, समाजातील विघातक गोष्टींना आळा घालून चांगल्या कामांना प्रोत्साहन देणे. कोरोनामुळे जागतिक स्तरावर जी परिस्थिती निर्माण झाली होती. तीचा एकत्रित मुकाबला करणे सर्वांचेच कर्तव्य होते. कोरोनाच्या काळात अनेक दानशूर व्यक्ती, संस्थांनी पुढे येवून मदतीचा हात दिला. त्यास पोलिस प्रशासाने सहकार्य केले. प्रत्येकाच्या छोटया-मोठया मदतीने आपण चांगले काम करु शकलो. याता सर्वांचे मोठे  सहकार्य आहे. श्री संत सावता माळी युवक संघाने यापुढेही चांगले काम करुना समाजसेवा करावी, असे सांगून आभार मानले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News