राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे जयंतीनिमित्त काँग्रेस पक्षातर्फे शेतकरी व कामगार बचाव दिन साजरा


राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे जयंतीनिमित्त काँग्रेस पक्षातर्फे शेतकरी व कामगार बचाव दिन साजरा

शेवगाव प्रतिनिधी सज्जाद पठाण

मोदी सरकारने शेतकरी व कामगारांच्या विरोधात जे काळे कायदे पारित केले त्याचा काँग्रेस पक्षातर्फे राज्यभर धरणे व निदर्शने करून निषेध व्यक्त करण्यात आला . तसेच हे काळे कायदे रद्द करण्याची मागणी करण्यात आली. त्याचाच एक भाग म्हणून शेवगाव तालुका काँग्रेस व अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटीमार्फत मार्केट कमिटी शेवगाव येथे धरणे व निदर्शने करण्यात आली . त्याप्रसंगी  शेवगाव तालुका काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष डॉ अमोल फडके व जिल्हा सचिव प्रा शिवाजी काटे यांनी मनोगत व्यक्त केले .तसेच याबाबतच्या पक्षाच्या भूमिकेचे निवेदन मा अर्चना पागिरे मॅडम  तहसीलदार      शेवगाव याना देण्यात आले . केंद्रशासनाने प्रचंड गोंधळाच्या वातावरणात आवाजी मतदानाच्या जोरावर कोणतीही चर्चा न करता असंवैधानिक पद्धतीने शेतकरी विरोधी विधेयके मंजूर करून घेतली .या घटनेचा अहमदनगर जिल्हा काँग्रेस व तालुका काँग्रेस तर्फे धरणे व निदर्शने या  माध्यमातून जाहीर विरोध व निषेध करण्यात आला .याप्रसंगी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नामदार बाळासाहेब थोरात साहेब ,महसूल मंत्री यांचे नेतृत्वाखाली या प्रकारे शेतकरी विरोधी विधेयकाला विरोध करत असलेचे जिल्हा सचिव प्रा.शिवाजी काटे व तालुकाध्यक्ष डॉ अमोल फडके  यांनी सांगितले. या नवीन कृषी विधेयकानुसार  कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे  अस्तित्व व व्यापारी,आडत दुकानदार यांवरील  नियंत्रण संपुष्टात आणून खाजगी व्यापारी, दलाल,बडे व्यापारी यांच्या दावणीला बळीराजा बांधला जाईल अशी भीती जाणकारांनी व्यक्त केली असल्याचे यांनी सांगितले . तसेच, बहुराष्ट्रीय कंपन्या शेतकरी मालावर डल्ला मारण्याची ,कृषी करारावर नियंत्रण नसणे , शेतकरी फसवणूक झाल्यास दाद मागण्याची प्रक्रिया सुलभ नसणे , जीवनावश्यक वस्तू नियमांत बदल करून  साठेबाजीवरील नियंत्रण पूर्ण काढून घेऊन शेतकरी व सर्वसामान्य ग्राहक यांची लूट होणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे .त्याचप्रमाणे सर्वात महत्त्वाचे म्हणजे या विधेयकानुसार किमान आधारभूत किंमत प्रणाली कालांतराने संपुष्टात आणून बळीराजालाच बळी देण्याच्या प्रकारास खतपाणी घालणारे हे विधेयक असल्याने याचा संपूर्ण देशभरात शेतकरी वर्ग व काँग्रेस पक्षातर्फे विरोध होत असल्याचे निवेदकांतर्फे सांगण्यात आले .

याप्रसंगी श्री .अल्पसंख्याक काँग्रेस विभागाचे तालुका अध्यक्ष बब्बूभाई शेख, सेवादल तालुका अध्यक्ष रामकिसन कराड,युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष कृष्णा डमाळ, उपाध्यक्ष किशोर कापरे,पांडुरंग नाबदे धनंजय डहाळे ,अस्लम पठाण,सत्तार पठाण, सरचिटणीस दशरथ धावणे,पांडुरंग वीर, रियाज शेख,अशोक वंजारी,दिलीप कवडे राजू गिरगे, जिल्हा कार्यकारणी सदस्य संजय जोशी,अंकुश महाराज गायकवाड  जब्बार पठाण  रवी लांडे,हसमुख पिसाळ,सुरेश निकाळजे,बाजीराव अंगरख,प्रताप काटकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते..

जाहिरात
Search
विडिओ
Recent News