अल्पवयीन मुलीवर नराधम मानलेल्या मामानेच केला अतिप्रसंग, नराधमास फाशी द्या पीडितेच्या आजीची मागणी


अल्पवयीन मुलीवर नराधम मानलेल्या मामानेच केला अतिप्रसंग, नराधमास फाशी द्या पीडितेच्या आजीची मागणी

विठ्ठल होले पुणे, दौंड प्रतिनिधी: मामा हे नाते सर्वात जवळचे आणि विश्वासाचे नाते आहे, परंतू या नात्याला काळीमा फासणारी घटना दौंड तालुक्यात घडली आहे,दिनांक 26 ऑक्टोंबर 2020 रोजी कालिदास ईश्वर ताकवणे याने फरसान खाण्याच्या बहाण्याने नात्याने भाची असलेल्या अल्पवयीन इयत्ता 6 वी मधील मुलीला घरात बोलवून लैंगिक अत्याचार केला आहे. याबाबत मुलीची आजी यांनी यवत पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दिल्याने भा द वि 376 व पोस्को ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय कापरे  यांनी आरोपीस तात्काळ अटक केली आहे.या घटनेची माहिती नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस चे पश्चिम महाराष्ट्र सचिव दादा जाधव यांना मिळताच त्यांनी एन.डी.एम.जे संघटनेचे राज्य सचिव वैभव तानाजी गिते यांना सर्व हकीकत सांगितली घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस या संघटनेचे राज्य सचिव वैभव गिते पश्चिम महाराष्ट्र सचिव दादासाहेब जाधव. एम.डी. एम. जे ( पुणे जिल्हा निरिक्षक )पांडुरंग गडेकर,प्रकाश पारदासानी. यशवंत वाघोले अमर जोगदंड. गावचे ग्रा प सदस्य ज्ञानेश्वर सांबळे .पोलिस मित्र रमेशजी चितारे हे  यावेळी उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News