श्रीगोंदा उपकारागृहाला कोरोनाने घेरले ५५ कैद्यांपैकी ३६ बाधीत: तालुक्यात शनिवारी ५२ जण संक्रमित.


श्रीगोंदा उपकारागृहाला कोरोनाने घेरले ५५ कैद्यांपैकी ३६ बाधीत: तालुक्यात शनिवारी ५२ जण संक्रमित.

श्रीगोंदा प्रतिनिधी (अंकुश तुपे) दि.३: श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या आवारात असलेल्या उपकारागृहात  विविध गुन्हयांच्या आरोपात ५५ कैदी आहेत. त्यातील काही कैदी सामान्य आजार व इतर तपासणीसाठी श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयात ये जा असते. ग्रामीण रुग्णालयात सध्या कोविड रुग्ण भरती असल्याने या कैद्यांना तेथून कोरोनाची लागण झाल्याचा संशय निर्माण झाला व काही कैदी सर्दी,ताप,खोकला या आजाराने त्रस्त झाल्यामुळे पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी तातडीने तालुका आरोग्य विभागाला पाचारण करून सर्व ५५ कैद्यांची कोविड चाचणी घेतली त्यात तब्बल निम्याहून अधिक कैदी पॉझिटिव्ह सापडले. ३० पुरुष कैदी व ६ महिला कैदी संक्रमित आढळल्याने आधीच कारागृहाच्या क्षमतेपेक्षा अधिक आरोपी अटकेत असल्याने कैद्यांच्या आरोग्य सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. यातील २३ कैद्यांना नगर येथील कारागृह कोविड केंद्रात पाठवले तर ११ कैद्यांना श्रीगोंदा येथील कोविड केंद्रात उपचारासाठी भरती केले. तर दोघांना जामिनावर सोडून देण्यात आले.

      श्रीगोंदयात शनिवारी १७८ रॅपिड अँटीजन चाचण्या व १४० घशातील स्राव घेतले. त्यात ५२ जण पॉझिटीव्ह आले. एकूण कोरोना बधितांची संख्या १७६३ झाली आहे. शनिवारी ३१ जण मुक्त झाल्याने एकूण कोरोनामुक्तांची संख्या १६०८ झाली आहे.तर आत्तापर्यंत ३३ जणांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीला ४८ जण कोविड केंद्रात उपचार घेत आहेत तर खाजगी हॉस्पिटलमध्ये ७४ जण उपचार घेत आहेत.

           श्रीगोंदा पोलीस कारागृहात ३६ जण व शहरात ६ जण पॉझिटिव्ह आले तर ग्रामीण भागात काष्टी-३, लिंपणगाव.२, उक्कडगाव-२, पारगाव-१, लोणी व्यंकनाथ-१,कोरेगाव येथे १ जण असे एकूण ५२ जण संक्रमित सापडले अशी माहिती तालुका आरोग्य विभाग व श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे निरीक्षक दौलतराव जाधव यांनी दिली.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News