सुनिता इंगळे यांना सर फाउंडेशन आयोजित राष्ट्रीयस्तर शैक्षणिक नवोपक्रम स्पर्धा २०२० राष्ट्रीय पुरस्कार जाहीर !!


सुनिता इंगळे यांना सर फाउंडेशन आयोजित राष्ट्रीयस्तर शैक्षणिक नवोपक्रम स्पर्धा २०२० राष्ट्रीय पुरस्कार जाहीर !!

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी

        स्टेट इनोव्हेशन ॲन्ड रिसर्च फाऊंडेशन,महाराष्ट्र (सर फाऊंडेशन,महाराष्ट्र) आयोजित राष्ट्रीयस्तर शैक्षणिक नवोपक्रम स्पर्धा 2020 मध्ये शालेयस्तरावर विविध नाविन्यपूर्ण शैक्षणिक प्रयोगांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी केलेल्या प्रयत्नांना (नवोपक्रमांना) याद्वारे राष्ट्रीय स्तरावरील  व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यात आले होते.यात देशभरातील अनेक क्षेत्रीय अधिकारी व प्रयोगशील शिक्षकांनी त्यांचे नवोपक्रम राष्ट्रीय स्तरावर सादर केले होते.

कोपरगाव नगरपालिका शाळा क्र ६ मधील उपक्रमशिल शिक्षिका सुनिता इंगळे यांनी प्राथमिक विभागातून स्टडी फ्राॕम होम हा नवोपक्रम सादर केला होता.यात त्यांनी १८ मार्चपासून लागलेल्या लाॕकडाऊन काळात शाळेतील व महाराष्ट्रातील  विद्यार्थ्यांसाठी शालेय सामान्यज्ञान प्रश्नमंजूषा उपक्रम राबवला होता.या त्यांच्या उपक्रमास महाराष्ट्रातून छान प्रतिसाद मिळाला होता .याच  १५०० प्रश्नांच्या  प्रश्नमंजूषेचे शालेय परीपाठ प्रश्नमंजुषा या पुस्तकाची निर्मिती त्यांच्याकडून करण्यात आली आहे.याचा फायदा निश्चितच सर्व विद्यार्थ्यांना झाला.हाच उपक्रम त्यांनी राष्ट्रीय स्तरावर पाठवला होता.व याच उपक्रमासाठी त्या़ंची सर फाऊंडेशन टिचर इनोव्हेशन नॕशनल अॕवार्ड साठी निवड करण्यात आली.

या अगोदर सन.२०११पासुन गणित विज्ञान प्रदर्शनात राज्यस्तरापर्यंत आपला सहभाग नोंदवला असुन त्यांचा टाकाउ पासुन टिकाउ हा उपक्रम बहूचर्चित आहे.तसेच

शिक्षिका सुनिता इंगळे या रयतेचा वाली या पाक्षिकाच्या कार्यकारी संपादकपदी कार्यरत असुन या माध्यमातुन त्यांनी राज्यभरातील उपक्रमशिल शाळा व शिक्षकांचे लेख प्रसिद्ध केले आहे. त्यांच्या या निवडी बद्दल  न.पा.शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी तुंबारे साहेब, पवार साहेब,मुख्याध्यापक आगलावे सर व सर्व शिक्षक तसेच सहकारी शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक पालक,शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष व विद्यार्थी यांनी अभिनंदन असुन त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News