सुरेगावमधून अल्पवयीन मुलगी बेपत्ता !!


सुरेगावमधून अल्पवयीन मुलगी बेपत्ता !!

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी.

 सुरेगाव- कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव ग्रामपंचायत हद्दीतील रहिवासी असलेली सोळा वर्षाची अल्पवयीन मुलगी अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी पळवून नेली असल्याची फिर्याद मुलीच्या वडिलांनी कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात दाखल केल्याने सुरेगाव परिसरात एकच खळबळ उडाली आहे तालुक्याच्या पश्चिम भागातील सर्वात मोठी समजली जाणारी सुरेगाव बाजारपेठ असून याठिकाणी विविध गावातून येणाऱ्या नागरिकांनी व्यवसाय सुरू केला आहे यामध्ये फिर्यादी मुलीचे वडील हे सुरेगाव मध्ये व्यवसाय करत असून ते आपल्या पत्नी व मुलासोबत सुरेगाव येथे राहतात त्यांची साधारण सोळा वर्षाची मुलगी असून ती मंगळवार दिनांक २९ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घरातून बेपत्ता झाली आहे तिचा नजीकचे नातेवाईक, आप्तस्वकीयाकडे शोध घेतला असता ती मिळून आली नाही त्यामुळे  २ ऑक्टोबर रोजी आपली मुलगी अज्ञात इसमाने पळून नेल्याची तक्रार केली आहे  कोणत्या कारणासाठी आपल्या मुलीला पळून नेली असल्याची फिर्याद मुलीच्या वडिलांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केली आहे कोपरगाव तालुका पोलिसांनी या प्रकरणी गु. र. क्रमांक ४९५/ २०२० भा.द.वि कलम ३६३ अन्वये अज्ञात इसमा विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल कटके  यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल सतीश बताने हे करीत आहेत या घटनेमध्ये सुरेगाव कोळपेवाडी परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे

जाहिरात
Search
विडिओ
Recent News