डॉ. आंबेडकरांचे आक्षेपार्ह लिखाणामुळे दोन दिवस धामोरी गाव बंद !!


डॉ. आंबेडकरांचे आक्षेपार्ह लिखाणामुळे दोन दिवस धामोरी गाव बंद !!

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी.

गावात तणावपूर्ण, शातंता ... !!

सुरेगाव :- कोपरगाव तालुक्यातील लोकसंख्येत मोठे असलेले धामोरी ग्रामपंचायत हद्दीतील वेशीजवळील स्वच्छता गृहावरती भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी आक्षेपार्ह शब्दप्रयोग केल्यामुळे धामोरी गावातील वातावरण तंग झाले होते.तात्काळ गावात अहमदनगर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात झाल्याने परिस्थिती नियंत्रणात आली असुन

गावामध्ये तणावपूर्ण शांतता असल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण तालुका पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी दिली आहे कोपरगाव तालुक्यातील जातीयसलोखा जपणाऱ्या धामोरी गावाच्या  शांततेला आज गालबोट लागले असून आज सकाळी गावातील सार्वजनिक मुतारीवर आतील बाजूवरील भिंतीवर अज्ञात व्यक्तीने काळ्या रंगाने आक्षेपार्ह लिखाण केल्याने गावात

असंतोष पसरला असून गावाने आज संपूर्ण गाव दोन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.गावातीलपरिस्थिती शांततेत पण तणावपूर्ण आहे या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे.सदरचे सविस्तर वृत्त असे की,धामोरी गाव हे कोपरगाव शहराच्या पश्चिम भागात २५ की.मी.अंतरावर आहे.या गावात सर्वच समाजाचे लोक गुण्या गोविंदाने नांदत

 असताना आज सकाळी गावाच्या वेशीलगत लागूनच बाहेरील बाजूने ग्रामपंचायतीच्या मालकीची

सार्वजनिक मुतारी आहे.सदर मुतारीवर आतील बाजूने रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने भारताचे घटनाकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर काळ्या कोळशासम रंगात आक्षेपार्ह टिपणी केलेले लिखाण आढळून

आले आहे.हि बाब सकाळी काही नागरिकांच्या लक्षात आली त्यांनी हि घटना सरपंच जयश्री नारायण भाकरे,पोलिस पाटील सौ संगिता विजय ताजणे ,उपसरपंच शिवाजी वाघ  यांचे लक्षात आणून दिली .या घटनेची वार्ता गावभर तालुक्यात पसरली सध्या मराठा आरक्षणाचा वाद ऐरणीवर असताना हि घटना घडल्याने त्यावर उलटसुलट चर्चा सुरु झाल्याने गावात वातावरण दूषित होऊ लागल्याने हि बाब कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे

पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या निदर्शनात नागरिकांनी तत्काळ आणून दिली.  त्यांनी तातडीने आपला फौजफाटा घेऊन घटनास्थळी धाव घेतली व परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.व सावधानता म्हणून

गावात पोलीस बळ वाढवले आहे.दरम्यान गावातील काही ग्रामस्थांनी गाव बंद ठेवण्याची मागणी केली त्याला समजदार नागरिकांनी पुढाकार घेऊन त्यास संमती दिली त्यामुळे धामोरी हे गाव दोन दिवस बंद ठेवण्यात आले आहे.गावात बहुजन समाज, बौध्द समाज ,आदिवासी समाज,मुस्लिम व बाराबलुतेदार समाज मोठ्या संख्येने आहे.सर्वांनी एकत्रितपणे येवून ह्या बांडगुळ वु्त्तिचा नायनाट करणे गरजेचे असल्याचे यावेळी नागरिकांन मधून बोलले जात आहे .

जाहिरात
Search
विडिओ
Recent News