आबासाहेब काकडे शिक्षणशास्त्र महाविद्यालयात महात्मा गांधी लालबहादूर शास्त्री यांची जयंती ऑनलाईन साजरी.


आबासाहेब काकडे शिक्षणशास्त्र महाविद्यालयात महात्मा गांधी लालबहादूर शास्त्री यांची जयंती ऑनलाईन साजरी.

शेवगाव प्रतिनिधी सज्जाद पठाण

तालुक्यातील  आबासाहेब काकडे शिक्षणशास्त्र महाविद्यालय, शेवगाव, येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती व मा. पंतप्रधान लालबहादूर शास्त्री जयंती ऑनलाईन गुगल मीटद्वारे साजरी करण्यात आली.  या प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते  राष्ट्रपिता महात्मा गांधी व मा. पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमप्रसंगी आबासाहेब काकडे शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रोहिदास उदमल्ले यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी व मा. पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीच्या कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.

  यावेळी डॉ. भाऊसाहेब देवकाते यांनी म. गांधीजींचे शैक्षणिक विचार स्पष्ट केले. तसेच कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते प्रा. राम नेव्हल यांनी आपल्या अभ्यासपूर्ण व्याख्यानातुन लालबहादूर शास्त्री यांचा जीवन परीचय व देशाच्या कारभारातील त्यांची रचनात्मक भूमिका स्पष्ट केली. तसेच महात्मा गांधीजींनी सांगितलेली तत्त्वे सत्य, अहिंसा, प्रेम, सत्याग्रह यांस उजाळा दिला व त्यांच्या तत्त्वांचे आचरण करण्याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

  कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयातील जेष्ठ प्रा. सुधीर खिल्लारे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी व मा. पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या कार्याचा उहापोह करत आपणही आपल्या जीवनात त्यांच्या विचारांचे अनुकरण करावे असे सांगितले. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन छात्राध्यापिका बोडखे हर्षदा हिने केले व आभार प्रदर्शन विखे जयश्री या छात्राध्यापिकेने केले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News