बघूया का कोण आहे .एक मन म्हणत होतं .दुसरं मन म्हणालं .राहू दे काय करायचंय.


बघूया का कोण आहे .एक मन म्हणत होतं .दुसरं मन म्हणालं .राहू दे काय करायचंय.

अहमदनगर( प्रतिनिधी संजय सावंत  )             

सकाळीच निलयाने मनाशी निग्रह केला की आजपासून मॉर्निंग वॉकला जायचेच .सकाळी सहा वाजता आज कितीतरी दिवसांनी ,नव्हे महिन्याननी ती बाहेर पडली.४०मिनिटे म्हणजे ४० मिनिटेच ठरवून ती भरभर  चालत होती.सरदार पटेल राष्ट्रीय उद्यानात एखादा माणूस चालताना दिसत होता.वर्दळ मात्र अजिबात नव्हती.तिला तिचा पाठोपाठ पावलांचा आवाज आला. मागे वळून पाहिले तर एक तिच्याच वयाचा हॅण्डसम तरुण चालत होता.झपाझप चालत तो पुढेही निघून गेला.पण का कोणास ठाऊक तो तिला ओळखीचा, खूप ओळखीचा  वाटला.

. बघूया का कोण आहे .एक मन म्हणत होतं .दुसरं मन म्हणालं .राहू दे काय करायचंय.

आणि तेवढ्यात डोळ्याखाली जोरदार अंधार येऊन ती कोसळलीच !शुद्धीवर आली तेव्हा निळया वेदांत हॉस्पिटलच्या बेडवर होती.आणि समोर तोच बसला होता.

काय मग कसं वाटतंय . सॉरी मी . . मला कळलंच नाही टी बोलण्याचा प्रयत्न करत होती.निलया, मी देवलीन शहापुरे, आपण लहानपणी पुण्यात एकाच ठिकाणी राहत होतो.आठवतंय .तरीच मला सकाळी वाटलंच मी तुला कुठेतरी पाहिलंय रात्री काही न खाल्ल्याने आणि म्हणून झोप न झाल्याने तिला चक्कर आली होती.निलयाने घडय़ाळात पाहिले .

घाबरू नकोस, मी निश्चल ला कळवलेले  आहे. तो येणार होता पण मी त्याला सांगितलं थोडय़ाच वेळात तुझ्या आईला सुखरूप घेऊन येतो म्हणून .तो हसतच म्हणाला.तिला आश्चर्यच वाटत होतं ह्याला एवढी माहिती लगेचच मिळाली कशी ?तिथून निघताना तो खूप काळजी घेत होता. डॉक्टरचे बिलही त्याने आधीच दिले होते.तिच्या घरी सुखरूप पोहोचवून तो निघणारच होता.

थांब देव, किती वर्षानी भेटलास बोलूया थोडं .

अगं नको .तुझा नंबर घेतला घरही माहित आहे येईन मी पुन्हा . आणि तो निघूनही गेला .

देवलीन आणि ती तीन चार वर्षे एकत्र वावरले खेळले नंतर हे कुटुंब कुठे तरी निघून गेले पण तिला देवलीन आठवत असायचा.

     कॉलेजमध्ये गेल्यावर वेदांतच्या प्रेमात पडलेल्या निलयाने त्याच्याशीच लग्न करायचं  म्हणून हट्ट धरला. पण वेदांतशी लग्न करून तुला आनंद लाभणार नाही हे आई- बाबांचे विधान धुडकावून लावून तिने वेदांतशीच पळून जाऊन लग्न केले.

   एका गोंडस मुलाला जन्मही दिला.निश्चल chya बाललीलांमध्ये आता तिचा पूर्ण वेळ जाई.आता हळूहळू त्यांच्या प्रेमाचा रंग उतरत चालला.वेदांत आणि तिच्यात अनेक लहान -सहान कारणावरूनही भांडणे होऊ लागली.दोघांनाही एकमेकांबद्दल प्रचंड संशय. शेवटी तीन वर्षांच्या   निश्चल ला टाकून वेदांत त्याच्या आई वडिलांकडे निघून गेला कायमचा  !नंतर घटस्फोट प्रचंड . .  मनस्ताप. .  विस्कटलेली घडी बसवताना निलया थकून गेली होती.नव्याने एकटीने सर्व घडी बसवताना तिला प्रथम नोकरी शोधावी लागली . निश्चय ला बेबी सिटिंगमध्ये ठेवणे, त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी, यातच किती वर्षे लोटली तिला कळलेही नाही. यानंतर तिला लग्नासाठी अनेकांनी विचारले पण तिला पुन्हा त्या गोष्टीत अडकायचे नव्हते. देवलीन आता कधी- कधी घरी येत असे. मनमोकळ्या भेटी व्यतिरिक्त दोघेही एक स्पेसच जणू सांभाळत होते. आणि अचानक एक दिवस देवलीन ने तिला सहजगत्या विचारलं.पुन्हा लग्न का केलं नाहीस. माझ्याशी करशील. विचारच नाही केला, तुला विचार करून सांगतेनिश्चल आता बारावीला होता .त्याच्याजवळ तिने विषय काढला.त्यालाही देवलीन बाबा म्हणून पसंत होता देवलीनला तिने होकार दिला.

   तो घरी येत होता .ते तिघेही बाहेरही जाऊ लागले . आणि एका कुटुंबाचं स्वप्न साकार होण्याची चिन्हे आता तिला दिसू लागली .

आपलं एक सुंदर घरकुल असावं प्रचंड प्रेम करणारा नवरा असावा एखादं मूल असावं या सर्व इच्छा आता प्रत्यक्षात उतरणार होत्या .दोघांमध्ये अटॅचमेंट वाढली होती.एकमेकांच्या साऱ्या गोष्टी दोघे एकमेकांना शेअर करीत होते.प्रत्येक गोष्ट आता तिची असो कि त्याची ती एकरूप झाली होती. आपल्याला कोणीतरी आहे आपली जबाबदारी घेणारी व्यक्ती आहे याचं सुख तिने अनुभवलं.सहा महिने खूप भरभरून आनंद देवलीनने निश्चल आणि निलयाला दिलं.

   आता बेंगलोरला दोन महिन्यांसाठी देवलीन ऑफिसच्या कामासाठी जाणार होता, तिथून आल्यावर दोघे लग्न करणार होते.

     पहिले आठ दिवस देवलिन सतत निलयाला फोन करत असे.मेसेज व्हिडिओ कॉल यांच्या माध्यमातून तो जणू तिचाच जवळ होता.हळूहळू मात्र त्याचे फोन कमी झाले .मेसेज व्हिडिओ कॉलही कमी कमी होत बंद झाले.दोन महिन्यांनी येणारा देवलीन तीन महिने उलटून गेले तरी परतलाच नाही. फोन केला तरी चिडचिड, व्हिडिओ कॉलवरून भांडणे राग उद्वेग सर्वच असहनीय!आणि त्यांनी तिला फोनवरून सरळ सांगून टाकलं तुझ्याशी माझं लग्न झालं नाही, लग्न करणार होतो पण बेंगलोरला आल्यावर माझी पहिली प्रेयसी निशा मला भेटली आणि ती माझ्यासोबतच आता राहत आहे माझ्या सारखीच अविवाहित म्हणून मला तुझ्याशी कोणत्याही प्रकारचा आता संपर्क नकोय, मी निशाला आपल्याबद्दल सर्व काही सांगून टाकलं आहे ,तिनं हि ते  मान्य केलं आहे .रोज प्रेमासाठी खूप भांडणारी. प्रेमासाठीच तडपणारी निलया या फोनने अवाक झाली, निःशब्द झाली.माणूस एवढा स्वार्थी कसा बनू शकतो. का प्रेमाचं नाटक करतो? आज निलय़ा समीर मुळे बरी झाली आहे. सावरते आहे .निश्चल साठी केवळ जगते आहे.तिला प्रश्न मात्र सतावतोच आहे की, जगात खरंच प्रेम आहे का?तिच्या विश्वासालाच  जबरदस्त तडा गेला आहे .तरीही कसलाही विचार न करणाऱ्या.  लाभे विण सेवा करणाऱ्या समीरसमोर फक्त ती नतमस्तक होतेय.. . देवाचीही भूमिका यापेक्षा वेगळी असेल का.हा विचार करून .

      --डॉ. सुचिता पाटील

साईबाबानगर. बोरीवली पश्चिम . मुंबई 

जाहिरात
Search
विडिओ
Recent News