२९ वर्षापासून दरोड्यातील दोन फरारी असलेले आरोपी अटक: पुणे ग्रा. LCB पथकाची कामगिरी


२९ वर्षापासून दरोड्यातील दोन फरारी असलेले आरोपी अटक: पुणे ग्रा. LCB पथकाची कामगिरी

विठ्ठल होले पुणे, पुणे ---  दरोड्या सारखे गंभीर गुन्हे करणारे दोघे जण 29 वर्षांपासून फरार असलेले आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे.

 मा.पोलीस अधीक्षक सो. पुणे ग्रामीण यांचे आदेशाने रेकॉर्डवरील पाहिजे, फरारी आरोपी पकडणेकामी विशेष मोहिम राबवित असताना आज  दिनांक ०२/१०/२०२० रोजी पुणे ग्रामीण LCB टिमला मिळालेल्या बातमीवरून *मुरगुड पोलीस स्टेशन जिल्हा कोल्हापूर गु.र.नं. १७/१९९१ व १९/१९९१ भा. द.वि. कलम ३९५,३९७* या दोन दरोडयाच्या गुन्हयातील रेकॉर्डवरील पाहिजे असलेले फरारी आरोपी नामे - 

*१)काळ्या उर्फ दामू बरोट्या नानावत उर्फ कंजारभट वय ५९ रा.यवत इंदिरानगर ता.दौंड जि.पुणे*

*२)अरविंद उर्फ सेनीर रामलाल राजपूत  उर्फ कंजारभट वय ५८ रा.दत्तवाडी उरुळीकांचन ता.हवेली जि.पुणे* 

    या दोघांना उरुळीकांचन येथून ताब्यात घेण्यात आलेले आहे. सदर आरोपींची वैदयकिय तपासणी करुन  मुरगुड पोलीस स्टेशन जिल्हा कोल्हापूर पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात येत आहे. सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली  पोहवा. महेश गायकवाड, निलेश कदम ,सुभाष राऊत, गुरू गायकवाड, विदयाधर  निचित, प्रमोद नवले यांनी केलेली आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News