ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त ज्येष्ठांची अनोखी ऑनलाईन मिटिंग,विचारपूस करत,काळजी घेण्याचा दिला संदेश


 ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त ज्येष्ठांची अनोखी ऑनलाईन मिटिंग,विचारपूस करत,काळजी घेण्याचा दिला संदेश

विठ्ठल  होले पुणे, दौंड प्रतिनिधी --- शोशल मीडिया वर तरुणाई झिंगाट होत असताना दौंड येथील ज्येष्ठांनी जुन्या सवंगड्यांशी ऑनलाईन संवाद साधत अनोख्या पद्धतीने ज्येष्ठ नागरिक दिन साजरा केला आहे. 1/10/20 हा ज्येष्ठ नागरिक दिण म्हणून साजरा केला जातो,त्यानिमित्ताने दौंड गजानन सोसायटी येथील ज्येष्ठ नागरिकांनी ऑनलाईन मिटिंग घेऊन सवंगड्याना ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या, झूम मिटिंग द्वारे  एकमेकांना  समोर पाहून खूप आनंद झाल्याचे ज्येष्ठ नागरिक संघाच्या उपाधक्ष्या अर्चना साने यांनी सांगितले. या अनोख्या मिटिंग ची संकल्पना सौ साने यांनी मांडली त्याला क्रियेटीव्ह लॅबच्या अर्चना मिसाळ यांनी सहकार्य करून आयोजन केले.यामध्ये सुधाकर जोगळेकर,प्रभाकर गुमास्ते,भुजबळ,भागवत,सुचित्रा चौधरी,श्री व सौ देशपांडे सिस्टर आदीचा यामध्ये समावेश होता,या सर्वांनी एकमेकांना खूप दिवसानंतर समोर पहिल्या वर सर्वजण खूप खुश झाले त्यामुळे मिटिंग मध्ये आनंदमय वातावरण तयार झाले होते.मुंबई,पुणे येथील ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते,अर्चना साने यांनी आगामी उपक्रमाची माहिती दिली तर शाम वाघमारे यांनी पुढील नियोजन  कसे असेल याचे वर्णन केले,इतर व्यक्तींनी आपापले मनोगत व्यक्त केले,शेवटी संघाचे अध्यक्ष दत्ताजी शिनोलीकर यांनी सर्वांना शुभेच्छा देऊन तब्येतीची काळजी घेण्याची विनंती केली. या अनोख्या मिटिंगची सुरवात राष्ट्रगीत गाऊन केली तर पसायदान म्हणून सांगता करण्यात आली.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News