फुले एज्युकेशन तर्फे श्रीमती अंजुम सय्यद हिला तीन चाकी सायकल भेट


फुले एज्युकेशन तर्फे श्रीमती अंजुम सय्यद हिला तीन चाकी सायकल भेट

माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री व राष्ट्रपिता गांधी यांच्या आदर्शाने वंचितताना मदत करा-रघुनाथ ढोक

विठ्ठल होले प्रतिनिधी पुणे:

पुणे- फुले एज्युकेशनल अँड सोशल फौंडेशनच्या बहुउद्देशीय सत्यशोधक केंद्रातर्फे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री व राष्ट्रपिता गांधी यांच्या जयंती चे निमित्ताने नुकतेच बारामती येथील दिव्यांग श्रीमती अंजुम सय्यद हिला तीन चाकी सायकल* व ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले ग्रंथ संस्थापिका सौ.आशा ढोक यांचे शुभहस्ते भेट देण्यात आले.यावेळी अध्यक्ष रघुनाथ ढोक, संयोजक आकाश व क्षितिज ढोक उपस्थित होते.

यावेळी रघुनाथ ढोक म्हणाले की माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसान नारा अमर करून देशसेवा केली तसेच  राष्ट्रपिता गांधी यांनी खेड्याकडे चला ,देश सेवा करा हा दिलेला मंत्र आपण सर्वांनी  वंचितताना मदत करून मानवताधर्म पाळत कार्य केले पाहिजे.पुढे असे ही म्हणाले की दिव्यांग वधु वर यांचे सत्यशोधक विवाह कोठेही असले तरी कायम मोफत लावणार आहे. आमचे संस्थेच्या वतीने कोव्हिडं मधील पहिले दिव्यांग सत्यशोधक विवाह अकलूज बोरगाव येथे 28 मे 2020 रोजी मोफत लावल्याचे सांगितले. दिव्यांग  लोकांना सायकली वाटपासाठी नेहमीच जेष्ठ समाजसेवक मोतीलाल शहा यांची मदत होते त्यांचे आभार आकाश ढोक यांनी मानले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News