शेवगांव शहरात मोका ट भटक्या आणि पिसाळलेल्या कुत्र्यांचा उच्छाद कुरेशी गल्लीत दोन बालकांना घेतला चावा ग्रामीण रुग्णालयात रेबीज लस उबलब्ध नाही


शेवगांव शहरात मोका ट भटक्या आणि पिसाळलेल्या कुत्र्यांचा उच्छाद कुरेशी गल्लीत दोन बालकांना घेतला चावा ग्रामीण रुग्णालयात रेबीज लस उबलब्ध नाही

शेवगाव प्रतिनिधी सज्जाद पठाण 

शेवगांव)ता 03 ऑक्टो. शेवगांव शहरात पिसाळलेल्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला असुन शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक बाजारपेठ कुरेशी गल्ली वॉर्ड नंबर आठ आणि वॉर्ड नंबर तेरा मध्ये अनेक लहान बालकांना चावा घेतला आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात अहमदनगर येथे उपचार सुरु असुन ती बालके  कुमारी आजवा आबुबकर शेख ऊमेर शाहानवाज कुरेशी दोन्ही घटना प्रभाग क्रमांक आठ मधील आहे वरील मुलीचा  खाजगी रुग्णालय नगर येथे उपचारासाठी नेण्यात आले आहे शासकीय रुग्णालयात शेवगांव येथे रेबीज ची लस उपलब्ध नाही शहरात गेल्या काही महिन्यांपासुन भटकी बेवारस पिसाळलेली कुत्री मोठ्या प्रमाणात वाढली असुन त्याचा त्रास शहरातील वृद्ध नागरिक बालक आणि दुचाकीस्वार यांना होत आहे. शहरातील मुख्य बाजारपेठ आणि काही गल्या मध्ये शेकडोंच्या संख्येने कुत्री फिरत असतात त्यांचा बंदोबस्त करणे शेवगांव नागरपरिषद चे काम आहे पण मागे ठेका देऊन काही कुत्री पकडून जंगलात सोडली होती पण आत मोठ्या प्रमाणात संख्या वाढल्या मुळे  यांचा बंदोबस्त होणे गरजेचे आहे. नगरपरिषद काय कोणाचा जीव जाण्याचा वाट पाहत आहे का यातील त्या बालिकेचा चेहरा पहावत सुद्धा नाही देव शेवगांव नागरपरिषद ला सुबुद्धी देवो  हीच अपेक्षा.

अविनाश देशमुख शेवगांव, सामाजिक कार्यकर्ता

जाहिरात
Search
विडिओ
Recent News